पश्चिमरंग : फ्लाइट ऑफ दी बम्बलबी

>>दुष्यंत पाटील

अॅलेक्झांडर पुश्कीन या रशियातील महान साहित्यकाराने रचलेल्या ‘दी टेल ऑफ झार सल्तान’ या काव्यावर आधारित ऑपेरा बनवण्यात आला. या ऑपेरामध्ये रचण्यात आलेले संगीत म्हणजे ’Flight of the bublebee’. रिम्स्की कोर्साकोव नावाच्या संगीतकाराने रचलेले हे अवघड संगीत त्या काळात प्रचंड गाजले आणि आजही ते तितकेच लोकप्रिय असून चित्रपटांमधून वाजवले जाते.

अलेक्झांडर पुश्कीन हा रशियात होऊन गेलेला एक अजरामर साहित्यकार. बऱयाचशा लोकांच्या मते तो रशियन साहित्याचा जनक होता. 1799 साली जन्मलेल्या या थोर साहित्यकारानं अवघ्या 37 वर्षांच्या आयुष्यात काव्य, नाटकं आणि कादंबऱया अशा प्रकारांत अनेक उत्कृष्ट साहित्यकृती निर्माण केल्या. 1831 मध्ये पुश्कीनने एक काव्य रचलं. ते एका रशियन लोककथेवर आधारित होतं. काव्याचं नाव होतं ‘दी टेल ऑफ झार सल्तान.’
1899 साली पुश्कीनच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने एक ऑपेरा बनवण्यात आला. हा
ऑपेरा पुश्कीनच्या ‘दी टेल ऑफ झार सल्तान’ या काव्यावर आधारित होता.
ऑपेरा बनवताना मूळच्या कथानकात थोडेफार फेरफार करण्यात आले होते. काही पात्रं नव्याने टाकण्यात आली होती, तर काही भागांत काटछाट करण्यात आली होती.
परिकथेला साजेसं असणारं हे कथानक असं काहीतरी होतं : यात एका राजाचा (झारचा) विवाह एका चांगल्या स्वभावाच्या युवतीशी होतो. या युवतीच्या दोन मोठय़ा बहिणी खलनायिकांच्या भूमिकेत असतात. राजा युद्धाच्या निमित्ताने राज्याच्या बाहेर गेल्यानंतर त्याच्या पत्नीला पुत्ररत्न प्राप्त होतं. मत्सरानं ग्रस्त असणाऱया तिच्या बहिणी (म्हणजे बाळाच्या मावश्या) बाळाला आणि आईला एका पिंपात बंद करून समुद्रात फेकून देतात.

पुढे हे पिंप एका दूरच्या बेटावर जातं, बाळाचा सुंदर तरुण होतो. हा तरुण बेटावरच्या एका हंसिनीला मदत करतो. नंतर ती हंसिनी तरुणाच्या जादूने एका मोठय़ा मधमाशीत रूपांतरीत होते. याचं कारण म्हणजे या तरुणाला आपल्या जन्मभूमीत जायचं असतं. तो मधमाशी बनून जहाजांमधून प्रवास करत समुद्र ओलांडून आपल्या वडिलांच्या राजवाडय़ात जातो. तिथे तो दोन्ही मावश्यांना वेगवेगळय़ा प्रसंगी डंखही मारतो.

राजवाडय़ात मधमाशी बनून उडताना एक प्रकारचं पार्श्वसंगीत या ऑपेरामध्ये देण्यात आलं होतं. संपूर्ण ऑर्केस्ट्रासाठी हे संगीत रचण्यात आलं होतं. हे संगीत ’इत्ग्gप्t द tप ंल्स्ंतां’ अशा नावाने प्रसिद्ध झालं. संगीत खूप कर्णमधुर होतं असं नव्हे, पण या संगीतात मधमाशीच्या उडण्याचा प्रसंग प्रतिबिंबित होता.
या ऑपेरासाठी संगीत रचना केली होती रिम्स्की कोर्साकोव नावाच्या संगीतकाराने. ऑर्केस्ट्रासाठी संगीत रचण्यात त्याचा हातखंडा होता. रशियातल्या लोकगीतांच्या चालींचा तो बऱयाचदा आपल्या संगीतात अप्रतिमरीत्या वापर करायचा.

मधमाशी उडताना आपली दिशा सतत बदलत असते. तिच्या उडण्याचा एका विशिष्ट प्रकारचा आवाज आपल्याला ऐकू येत असतो. हा आवाज कमी-जास्त होत असतो. या संगीतात हे अतिशय परिणामकारकरीत्या दाखवलं होतं. वेगवेगळय़ा वाद्यांचा परिणामकारक वापर या संगीतात करण्यात आला होता. हे संगीत प्रचंड गाजलं.

हे संगीत वाजवायला अवघड होतं. या संगीतातल्या एका भागात
ाढाsमॅटिक पट्टीतले सारे स्वर प्रचंड वेगाने येत होते (ाढाsमॅटिक पट्टीत संगीतात वापरले जाणारे सारेच्या सारे बारा स्वर येतात). इतकी अवघड रचना वाजवून श्रोत्यांची वाहवा मिळवण्यासाठी ही रचना नंतरच्या काळात संगीताच्या कार्पामांमध्ये सादर करण्यात येऊ लागली.

चार्ली चॅप्लिनच्या 1925 मध्ये आलेल्या ‘दी गोल्ड रश’ नावाच्या चित्रपटात हे संगीत वापरण्यात आलं. 1936 मध्ये अमेरिकेत रेडिओवर एक कार्पाम यायचा. या कार्पामाचं नाव होतं ‘दी ग्रीन हॉर्नेट!’ यातला नायक स्वतची ओळख लपवण्यासाठी एक प्रकारचा मुखवटा धारण करायचा आणि अन्यायाविरुद्ध लढायचा. या कार्पामात थीम संगीत म्हणून ‘फ्लाइट ऑफ दी बम्बलबी’चं संगीत वापरलं गेलं. लोकांच्या मनात या पात्रासोबत हे संगीत इतकं जोडलं गेलं की, नंतरच्या काळात याच पात्रावर आधारित एक टीव्ही मालिका आणि चित्रपटही निघाले. तेव्हाही हेच संगीत त्यात वापरण्यात आलं होतं. यानंतर कित्येक ठिकाणी हे संगीत वापरण्यात आलं. अगदी अलीकडच्या काळात 2017 मध्ये आलेल्या एका चिनी चित्रपटातही (Our Shining Days) हे संगीत वापरण्यात आलं.

एखाद्या मधमाशीच्या उडण्यावर केलेली रचना सव्वाशे वर्षांनंतरही इतकी का लोकप्रिय असावी हे पाहण्यासाठी आपण Flight of the bublebee ही रचना एकदा तरी यूटय़ूबवर ऐकायलाच हवी.
[email protected]