पीएफ अकाऊंटला मोबाईल नंबर लिंक करताना…

नोकरदारांच्या पगारातील एक भाग पीएफ म्हणून कापला जातो. कर्मचाऱयांच्या पीएफ अकाऊंटसंबंधित माहिती, शिल्लक रक्कम आणि योगदान यासंबंधीची माहिती नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर पाठवली जाते. जर तुम्हाला प्रोव्हिडंट फंड (पीएफ) अकाऊंटला जोडलेला मोबाईल नंबर बदलायचा असेल तर प्रक्रिया एकदम सोपी आहे.

कसे कराल

तुमच्या ईपीएफ अकाऊंटसोबत तुमचा मोबाईल नंबर लिंक करण्यासाठी सर्वात आधी ईपीएफओ इंडियाची अधिकृत वेबसाईट https://www.epfindia.gov.in ला भेट द्या. यानंतर ‘फॉर एम्प्लॉइज’ हा पर्याय निवडा. आता यूएएन/ऑनलाइन सेवा या पर्यायावर क्लिक करा. यूएएन आणि पासवर्डद्वारे लॉगिन करा. यानंतर ओटीपी टाकावा. यानंतर कॉन्टॅक्ट डिटेल्स यावर क्लिक करा. शेवटी वेरिफाय करा आणि ‘मोबाईल नंबर बदला’ या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर, आधारशी लिंक केलेला मोबाईल नंबर प्रविष्ट करा. ओटीपीवर क्लिक करा.