मुंबई विद्यापीठाचा मदतीचा हात; आर्थिक दुर्बल आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना दीड कोटीचे अर्थसहाय्य

मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये, शैक्षणिक संस्थेत शिकणाऱया गरजू आणि आर्थिक दुर्बल घटकातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना विद्यापीठाने 1 कोटी 57 लाख 82 हजारांचे अर्थसहाय्य केले आहे.

‘पुस्तक पेढी’ योजनेअंतर्गत महाविद्यालयातील 24 हजार 604 आणि शैक्षणिक विभागातील 89 विद्यार्थ्यांसाठी 71 लाख 51 हजार रुपये वितरीत केले आहेत. आर्थिकदृष्टय़ा गरजू आणि मागासवर्गीय विद्यार्थी योजनेअंतर्गत महाविद्यालयातील 176 आणि शैक्षणिक विभागातील 25 विद्यार्थ्यांसाठी 3 लाख 17 हजार 580 रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. तिसऱया योजनेअंतर्गत महाविद्यालयात शिकणाऱया अनुसूचित जमातीच्या 722 विद्यार्थ्यांसाठी 58 लाख 81 हजार 500 रुपयांचे आर्थिक सहाय्य केले आहे. तर चौथ्या योजनेअंतर्गत विद्यापीठातील विविध शैक्षणिक विभागात शिकणाऱया 76 एस.सी./ एस.टी./ डी.टी./ एन.टी. विद्यार्थ्यांना 24 लाख 32 हजार रुपये निधी वितरीत केला आहे. या चारही योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागामार्फत स्वतंत्र संकेतस्थळ तयार करून संलग्नित महाविद्यालये, मान्यताप्राप्त संस्था आणि विद्यापीठातील शैक्षणिक विभागांकडून ऑनलाइन अर्ज मागवले होते.

या योजनांसाठी अर्थसहाय्य

  • पुस्तकपेढी 71 लाख 51 हजार रुपये
  • आर्थिकदृष्टय़ा गरजू आणि मागासवर्गीय विद्यार्थी 3 लाख 17 हजार 580
  • अनुसूचित जमाती विद्यार्थी 58 लाख 81 हजार 500 रुपये
  • एससी, एसटी, डीटी-एनटी विद्यार्थी 24 लाख 32 हजार