शंभरावा प्रयोग ‘ही स्वामींची इच्छा’, एकाच दिवशी तीन प्रयोग

‘ही स्वामींची इच्छा’ या नाटकाचा शंभरावा प्रयोग 9 जुलै रोजी एकाच दिवशी तीन प्रयोग सादर करून होणार आहे. सकाळी बोरिवलीचे प्रबोधनकार ठाकरे नाटय़गृह, दुपारी दामोदर नाटय़गृह, परळ आणि रात्री विलेपार्ले येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर नाटय़गृहात प्रयोग होईल, असे नाटय़निर्माते, लेखक, दिग्दर्शक रमेश वारंग यांनी सांगितले.

‘ही स्वामींची इच्छा’ वेगळय़ा धाटणीचे नाटक आहे. मठाबाहेर फुलं विकणाऱया कष्टकरी मुलांची ही कथा आहे. यामध्ये बालकलाकार अनुश्री केसरकर, विभुती मोडक आणि विनया तळेकर, स्नेहा कासकर, समीक्षा गोडांबरे, आरती परब, रुक्मिणी गावकर, करण पवार, रमेश वारंग आहेत. ज्येष्ठ रंगकर्मी के. राघवकुमार यांनी स्वामींची भूमिका साकारली आहे.