‘इस्रो’चे प्रमुख डॉ. एस. सोमनाथ यांना कर्करोग, सोमनाथ यांनी स्वत: दिली माहिती

‘इस्रो’चे प्रमुख डॉ. एस. सोमनाथ यांना कर्करोगाचे निदान झाले आहे. नुकत्याच एका मुलाखतीत त्यांनी हा खुलासा केला आहे. आदित्य एल 1 मिशन प्रक्षेपणादिवशी त्यांना या आजाराचे निदान झाले. एवढेच नाही तर ऐतिहासिक चंद्रयान-3 मोहीमेदरम्यान त्यांना प्रकृतीच्या समस्या होत होत्या.

डॉ. एस. सोमनाथ यांना ‘चांद्रयान-3 च्या प्रक्षेपणाच्या वेळी आरोग्याबाबत काही समस्या होत्या. मात्र, तोपर्यंत याबाबतची स्थिती स्पष्ट झाली नव्हती. तेव्हा काहीच कळत नव्हते. मात्र ज्यादिवशी सूर्याचा अभ्यास करण्यासाठी हिंदुस्थानने पाठविलेले ‘आदित्य एल 1’ चे प्रक्षेपण झाले, त्याचवेळी त्यांना कॅन्सरचे निदान त्यांनी सांगितले. रिपोर्टनुसार, सोमनाथ सांगतात की, ही बातमी केवळ त्यांच्यासाठीच नाही तर कुटुंबासाठीही धक्कादायक होती.

गेल्या वर्षी 23 ऑगस्ट रोजी चांद्रयान-3 ने चंद्रावर यशस्वी लँडिंग करून इतिहास रचला होता. मागच्या वर्षी 2 सप्टेंबर रोजी आदित्य एल-1 मिशन लॉन्च करण्यात आले होते. या दरम्यान एस सोमनाथ यांची तपासणी करण्यात आली आणि स्कॅनिंगमध्ये पोटात काही प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. वृत्तानुसार, माहिती मिळताच ते पुढील तपासासाठी तामिळनाडूची राजधानी चेन्नईला रवाना झाले. येथे त्यांना आनुवंशिक आजार असल्याचे निदान झाले. त्यावेळी ते गंभीर आजारी असल्याचे स्पष्ट झाले होते.