जम्मू-कश्मीरमध्ये चकमक, लश्कर-ए-तोएबाच्या कमांडरसह 2 दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू-कश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) दहशतवाद्यांचा सफाया सुरुच आहे. ताज्या चकमकीमध्ये सुरक्षा जवानांनी लश्कर-ए-तोएबाच्या (Lashkar-e-Taiba) टॉपच्या कमांडरसह दोन दहशतवाद्यांना यमसदनी धाडले. पुलवामा (Pulwama) जिल्ह्यातील परिगाम (Parigam) गावामध्ये ही चकमक झाली.

पुलवामा जिल्ह्यातील परिगाम गावामध्ये दहशतवाद्यांचा राबता असल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे जवानांनी या भागामध्ये शोधमोहीम सुरू केली. यादरम्यान दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार करत फरार होण्याचा प्रयत्न केला. मात्र जवानांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारामध्ये दोन दहशतवादी ठार झाले. यातील एक दहशतवादी लश्कर-ए-तोएबाचा कमांडर असल्याची माहिती मिळतेय.