गुंतवणूकदारांनी पाच दिवसांत कमावले 7 लाख कोटी

अवघ्या पाच दिवसांत गुंतवणूकदारांनी 7.90 लाख कोटी कमावले. मोठय़ा प्रमाणावर झालेल्या शेअर्सच्या खरेदीमुळे शेअर बाजाराचा निर्देशांक चढाच राहिला. मंगळवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 274 अंकांनी वधारून 65,479.05 अंकांवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 66.45 अंकांनी वधारून 19,389 अंकांवर पोहोचला. मंगळवारी एका दिवसात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत तब्बल 46 हजार कोटी रुपयांची वाढ झाली. आयटी, बँकिंग आणि आर्थिक शेअर्समध्ये सर्वाधिक तेजी दिसली.

या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण
11 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण दिसली. यात भारती एयरटेलच्या शेअर्समध्ये सर्वाधिक म्हणजेच 1.37 टक्क्यांची घसरण दिसली. याशिवाय ऑक्सिस बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, इंडस्इंड बँक आणि टाटा स्टील या कंपन्यांचे शेअर्स लाल रंगात बंद झाले. या कंपन्यांच्या शेअर्समध्ये 0.66 टक्क्यांपासून ते 1.06 टक्क्यांपर्यंत घसरण दिसली.