Photo – विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात शिवसैनिकांमध्ये संताप; राज्यभरात निदर्शने

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पक्षपाती निर्णय देत शिवसेना पक्ष गद्दारांचा असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून आज मुंबईत ठिकठिकाणी जोरदार निदर्शने केली. ‘शिवसेना झिंदाबाद’, ‘आवाज कुणाचा शिवसेनेचा’, ‘राहुल नार्वेकरांचे करायचे काय, खाली डोके वर पाय’, ‘गद्दार सरकार हाय हाय’ अशा गगनभेदी घोषणा देत शिवसैनिकांनी शिवसेना भवनसमोर जोरदार निदर्शने केली, तसेच संतप्त शिवसैनिकांनी रस्त्यावर ठिय्या देत रस्ता रोको केला. तसेच नार्वेकर यांच्या प्रतिमेला जोडे मारत आपला संताप व्यक्त केला.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला न्याय नाकारत विधानसभा अध्यक्षांनी गद्दारांना झुकते माप दिले आहे. सायंकाळी दिलेल्या या निर्णयाविरोधात मुंबईसह राज्यभरात पडसाद उमटले असून शिवसैनिकांनी निदर्शने, रस्ता रोको करत, काळे झेंडे फडकवत राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या एकांगी निर्णयाचा निषेध केला. तसेच नार्वेकर यांनी दिलेला निर्णय म्हणजे मिलीभगत असल्याचा आरोपही केला.

राहुल नार्वेकरांना बांगडय़ांचा आहेर
सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न करता गद्दार शिंदे गट हाच शिवसेना असल्याचा निर्णय दिल्याने शिवसेनेच्या रणरागिणींनी शिवसेना भवनासमोर राहुल नार्वेकर यांचा निषेध करत त्यांना बांगडय़ांचा आहेर दिला.

मंत्रालयाबाहेर घोषणाबाजी
शिवसेना विभाग क्र. 12 च्या वतीने मंत्रालयासमोर जोरदार निषेध नोंदवत ‘लोकशाहीचा भरदिवसा खून’, ‘परत एकदा सत्य हरले, खोके जिंकले’, ‘विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा धिक्कार असो’ असे फलक झळकावत निषेध केला. यावेळी शिवसेना उपनेते रवींद्र मिर्लेकर, राजकुमार बाफना, विभागप्रमुख संतोष शिंदे, महिला विभाग संघटक युगंधरा साळेकर यांच्यासह मोठय़ा संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

  • शिवसेना विभाग क्र. 9 मधील शीव-कोळीवाडा विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांमध्ये संताप

शिवसेना विभाग क्र. 9 मधील शीव-कोळीवाडा विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांच्या वतीने विभागप्रमुख प्रमोद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला विभाग संघटक पद्मावती शिंदे व विधानसभाप्रमुख गोपाळ शेलार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी विधानसभा निरीक्षक शिवाजी गावडे, विधानसभा संघटक गजानन पाटील, आनंद जाधव, विनायक तांडेल, उपविभागप्रमुख दत्ता भोसले, प्रभाकर भोगले, एकनाथ पवार, राजेश कुचिक, सहसंघटक घनश्याम गवंडी, विधानसभा समन्वयक रणजित चोगले, उपकार खोत, महिला उपविभाग संघटक प्रणीता वाघधरे, शारदा गोळे, सुहासिनी ठाकूर, माजी नगरसेवक रामदास कांबळे, माजी नगरसेवक स्मिता गावकर, शाखाप्रमुख विनोद मोरे, संजय म्हात्रे, संजय भाबळ, संजय कदम, प्रशांत जाधव, सचिन खेडेकर, प्रकाश हसबे, समाधान जुगदर, शाखासंघटक विद्या केणी, नंदा साहू, छाया येलीगट्टी, जना नेळगे, कल्पना खणकर, जयश्री कोळंबेकर, युवा विभाग अधिकारी ऋषी नेळगे, युवती विभाग अधिकारी डॉ. आरती बिंद व पदाधिकारी, शिवसैनिक व युवासैनिक उपस्थित होते.

  • शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विभाग क्र 1 तर्फे जोरदार निदर्शने 

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विभाग क्र 1 तर्फे जोरदार निदर्शने  करण्यात आली. शिवसेना उपनेत्या संजना घाडी, विभागप्रमुख उदेश पाटेकर, आमदार विलास पोतनीस, विभाग संघटक सुजाता शिंगाडे, माजी नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद, माधुरी भोईर, रिद्धी खुरसंगे, हर्षद कारकर, सुजाता पाटेकर, संजय घाडी, संध्या दोशी, उपविभागप्रमुख पांडुरंग देसाई, चेतन कदम, राजू मुल्ला, योगेश भोईर, विनायक सामंत, सचिन शिर्पे, अशोक सोनवणे, मनोहर खानविलकर, उपविभाग संघटक दीक्षा कारकर, अश्विनी सावंत, शरयु भोसले, अमिता सावंत, उषा कोरगावकर, सोनाली विचारे, रेखा बोराडे आदी उपस्थित होते.

  • अलिबागमध्ये शिवसैनिकांचा भाजप कार्यालयासमोरच काळे झेंडे दाखवून निषेध

अलिबागमध्ये जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी थेट भाजप कार्यालयासमोरच काळे झेंडे दाखवून निषेध आंदोलन केले. यावेळी तालुकाप्रमुख शंकर गुरव, अलिबाग शहरप्रमुख संदीप पालकर, थळ विभागप्रमुख रूपेश जामकर, चौल विभागप्रमुख मारुती भगत, अजित पाटील, कमलेश खरवले, अलिबाग शहर संघटिका राखी खरवले, अलिबाग उपतालुका संघटिका शीतल पेडणेकर, युवासेना युवती उपशहर अधिकारी दीपश्री भोई आदी शिवसैनिक उपस्थित होते.

  • चेंबूर व अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघात आंदोलन

चेंबूर व अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघात आंदोलन करण्यात आले. आमदार प्रकाश फातर्पेकर, विधानसभा संघटक निमिष भोसले, संजय नटे, माजी नगरसेवक अनिल पाटणकर, श्रीकांत शेटये, शशिकांत पाटील, विधानसभा संघटक अंजली नाईक, निलम डोळस, वत्सला पाटील, निधी शिंदे, सुमित्रा नेंमाडे यांच्यासह शेकडो शिवसैनिक उपस्थित  होते.

  • वरळीत शिवसैनिक आक्रमक

लोकशाहीचा खून करणाऱया विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निकालाविरोधात वरळी नाक्यावर शिवसैनिकांतर्फे जोरदार आंदोलन करण्यात आले. राहुल नार्वेकर हायहायअशा घोषणाबाजींनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला. त्यावेळी विभागप्रमुख आशीष चेंबूरकर, आमदार सुनील शिंदे, शाखाप्रमुख दीपक बागवे, युवासेनेचे उपविभाग अधिकारी अभिजित पाटील, विभाग अधिकारी संकेत सावंत, उपविभाग संघटक ज्योती दळवी, शाखा संघटक अनिता नायर आणि अनेक शिवसैनिकांना अटक करून सोडून देण्यात आले