‘ओह माय गॉड 2’ सिनेमावर सेन्सर बोर्डाचा आक्षेप, लोकांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात

अभिनेता अक्षय कुमार याची प्रमुख भूमिका असलेला ‘ओह माय गॉड 2’ सिनेमावर सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतला आहे. हा सिनेमा रिव्ह्यू कमिटीकडे पाठवण्यात आला आहे. सिनेमाचा दोन दिवसांपूर्वी टीझर लॉन्च झाला असून सिनेमा 11 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. मात्र सिनेमातील काही संवाद आणि दृश्यांमुळे लोकांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात असे सांगत सेन्सॉर बोर्डाने सिनेमावर आक्षेप घेतला आहे.

अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेते पंकज त्रिपाठी यांची महत्वाची भूमिका असलेला ‘ओह माय गॉड 2’ सिनेमावर सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतला आहे. या सिनेमाला रिव्ह्यू समितीकडे पाठवण्यात आले आहे. जर त्या समितीनेही या सिनेमाला हिरवा झेंडा न दिल्यास हा सिनेमा प्रदर्शित होऊ शकत नाही. ‘ओह माय गॉड 2’ च्या टिझरमध्ये अक्षय कुमार भगवान शंकराच्या वेशात दिसत आहेत. याआधी अक्षय कुमार भगवान कृष्णाच्या भूमिकेत दिसला होता.

‘ओह माय गॉड 2’ या सिनेमात अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठी महत्वाच्या भूमिकते दिसणार आहेत. मुलांच्या सेक्स एज्युकेशनवर सिनेमाबाबात अनेक काळापासून चर्चा सुरू होत्या. ‘ओह माय गॉड 2’चा टीझर ऑनलाईन रिलीज झाला आहे. तो पाहून हा सिनेमाही ‘ओह माय गॉड’ सारखाच असणार आहे याचा अंदाज लावला जाऊ शकतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

काही दिवसांपूर्वी चाहत्यांमध्ये चर्चा होती की, परेश रावल यांनी कोणत्या कारणामुळे हा सिनेमा सोडला असावा. मात्र एका मुलाखतीमध्ये त्यांनी स्पष्ट केले होते की, त्यांना या सिनेमाची कथा आवडली नाही. ते त्यांचे आतापर्यंत करिअर आणि त्यांच्या भूमिकांविषयी समाधानी होते. ते या सिनेमात काम करत नाहीय कारण त्यांच्यासाठी सिक्वेलमध्ये काम करणं म्हणजे मागच्या परिस्थितीचा फायदा घेणे आहे. तसंही सिक्व्लेच्या भूमीकेबाबत त्यांना मजा आली नव्हती आणि त्यामुळे मी सिनेमा नाकारला. पुढे त्यांनी सांगितले की, ‘लगे रहो मुन्नाबाई’ सारखा सिक्व्लेल बनायला हवा.