जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना अटक

म. 538 कोटी रुपयांच्या बँक घोटाळा केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. अटक करण्याआधी त्यांची शुक्रवारी कसून चौकशी करण्यात आली. गोयल यांना उद्या कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

गोयल यांना आज सकाळी ईडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी बोलावले होते. याआधी दोनदा बोलावूनही ते ईडी कार्यालयात हजर झाले नव्हते. ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना चौकशीसाठी मुंबईला आणले होते. चौकशी केल्यानंतर गोयल यांना अटक केली. सीबीआयच्या एफआयआरवर आधारित ईडीने मे महिन्यात गोयल यांच्या निवासस्थानी आणि त्यांच्या कार्यालयासह मुंबईतील सात ठिकाणी धाडी मारल्या होत्या. जेट एअरवेजच्या नरेश गोयल, अनिता गोयल, गौरंग आनंद शेट्टी आणि अज्ञात लोकांविरुद्ध फसवणूक, गुन्हेगारी षड्यंत्र आणि विश्वासघात केल्याचा आरोप केला आहे. यामुळे कॅनरा बँकेला 538.62 कोटी रुपयांचे नुकसान झाले होते, असे 23 नोव्हेंबर 2022 मध्ये पॅनरा बँकेच्या अधिकाऱ्यांनी सीबीआयच्या एफआयआरमध्ये म्हटले आहे.