उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गिरगाव, शिवडी, मालाड यासह अनेक ठिकाणी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात विद्यार्थ्यांना वह्या, टॅब वाटप, ज्येष्ठांचा सत्कार, रक्तदान आणि आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.

शिवसेना शाखा क्रमांक 215, युवासेना आणि जय भवानी प्रतिष्ठान यांच्या वतीने विभागातील दहावी, बारावीतील 300 गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारसोहळा जनता केंद्र हॉल येथे करण्यात आला. यावेळी शिवसेना नेते, खासदार अरविंद सावंत, उपनेते, सिंधुदुर्ग-कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, उपनेते राजकुमार बाफना, दक्षिण मुंबई विभागप्रमुख संतोष शिंदे, मलबार हिल विधानसभा संघटक अरविंद बने, उपविभाग प्रमुख सुजित राणे, उपविभाग संघटक शोभा जगताप, विभाग संघटक सुरेखा परब, मलबार हिल विधानसभा समन्वयक शिवाजी राहणे, शाखा समन्वयक विजय पवार आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेविका अरुंधती दुधवडकर, शाखाप्रमुख सिद्धेश माणगांवकर, शाखा संघटक सुप्रिया शेडेकर, मलबार हिल युवसेना अधिकारी-विस्तारक हेमंत दुधवडकर यांनी केले होते.

शिवसेना गटनेते अजय चौधरी यांच्या वतीने, केईएम रुग्णालय यांच्या सहकार्याने शिवडी विधानसभेत मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवसेना नेते, खासदार अरविंद सावंत, उपनेत्या किशोरी पेडणेकर, उपनेते मनोज जामसुतकर, दगडू सकपाळ, विभागप्रमुख आशीष चेंबूरकर, विधानसभा संघटक सुधीर साळवी, लता रहाटे, श्वेता राणे, रूपाली चांदे, श्रद्धा जाधव, सचिन पडवळ, अनिल कोकीळ, सिंधू मसुरकर, दत्ता पोंगडे, डॉ. वाजा, वैभवी चव्हाण, दिव्या घाडीगावकर उपस्थित होते.  शिबीर यशस्वी करण्यासाठी उपविभागप्रमुख गजानन चव्हाण, शाखाप्रमुख जयसिंग भोसले यांनी विशेष मेहनत घेतली.

तीन यशवंतांना शिष्यवृत्ती

विभागप्रमुख-आमदार संजय पोतनीस यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली कलिना विधानसभेच्या वतीने रविवारी दहावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ माजी खासदार अनंत गीते यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला. सर्वाधिक गुण मिळवलेल्या स्पृहा संदीप शिंदे, ओमकार संजय कदम, यश राजेश सावंत या तीन विद्यार्थ्यांना माजी नगरसेविका सुनयना पोतनीस यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ अनुक्रमे 75, 50 आणि 25 हजारांची शिष्यवृत्ती देण्यात आली. त्याचबरोबर विभागातील 350 विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्र आणि भेटवस्तू देण्यात आली. यावेळी विभाग संघटक संजना मुणगेकर, विधानसभा संघटक डॉ. महेश पेडणेकर, विधानसभा संघटक हर्षदा परब, उपविभागप्रमुख बळीराम घाग, राजू परब, उपविभाग संघटक साधना डाळ, गीता मोरे, माजी नगरसेवक दिनेश कुबल, सुगुण नाईक यांच्यासह शिवसेना, युवासेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

शाखा क्रमांक 221, 222 आणि माऊली प्रतिष्ठानच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार आणि आरोग्यवर्धक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी माजी विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ, कुलाबा विधानसभा समन्वयक सुनील देसाई, माऊली प्रतिष्ठानच्या उपाध्यक्षा पल्लवी सकपाळ, युवासेना सहसचिव प्रथमेश सकपाळ, शाखा 222 चे समन्वयक नीलेश देवळेकर, शाखा 221 चे समन्वयक अभिजित गुरव, शाखा संघटक माधुरी पेंढारी, माजी शाखाप्रमुख दिलीप म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते