IREDA IPO मिळालेल्या गुतंवणूकदारांची चांदी; लिस्टिंगनंतर दोन दिवसात 12880 रुपयांचा फायदा, शेअरमध्ये तुफान तेजी

सरकार फायनान्स कंपनी IREDA ने शेअर बाजारात जबरदस्त एन्ट्री घेतली आहे. या आयपीओने लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना जबरदस्त रिटर्न दिला आहे. हा आयपीओ 56 टक्के प्रिमियमवर लिस्ट झाला. या आयपीओची प्राइज 32 रुपये होती. हा शेअर एनएसई आणि बीएसईवर 50 रुपयांना लिस्ट झाला. गुंतवणूकदारांना 56.25 टक्के प्रिमियन दिला आहे. लिस्टिंगनंतर अजूनही या शेअरमध्ये तेजी दिसून येत आहे. आता हा शेअर 60 रुपयांवर पोहचला आहे. म्हणजेच लिस्टिंगनंतर दोन दिवसातच या शेअरने तब्बल 87.5 टक्क्यांचे रिटर्न दिले आहेत.

IREDA IPO इश्यू प्राइस 32 रुपये होता आणि लिस्टिंगनंतर बीएसईवर या शेअरची किंमत 50 रुपये होती. म्हणजेच एका शेअरमागे गुंतवणूकदारांची 18 रुपयांची कमाई झाली. आयपीओची लॉट साइज 460 शेअरची होती. त्यामुळए एका लॉटमागे गुंतवणूकदारांना 8,280 रुपयांचा फायदा झाला. तसेच आता शेअर 60 रुपयांवर पोहचल्याने एका लॉटमागे गुंतवणूकदारांना 12.880 रुपयांचा फायदा झाला आहे. तसेच या शेअरमध्ये अशीच तेजी राहण्याची शक्यता असल्याने गुंवणूकदारांचा चांगला फायदा होत आहे.