छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते नागपूर आणि सोलापूरसाठी मध्य रेल्वे 2 एकमार्गी विशेष गाड्या चालवणार

प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेत मध्य रेल्वेकडून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते नागपूर आणि सोलापूर 2 एकमार्गी विशेष गाड्या चालवणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-नागपूर सुपरफास्ट वन वे स्पेशल ०२१०३ सुपरफास्ट एकेरी विशेष गाडी शनिवार 02-12-2023 रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून 00.20 वाजता सुटेल आणि नागपूर येथे त्याच दिवशी 15.32 वाजता पोहोचेल. या गाडीला दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मुर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा हे थांबे असतील. या गाडीला 17 डबे असतील. त्यात एक द्वितीय वातानुकूलित, तीन तृतीय वातानुकूलित, 8 शयनयान, 2 गार्ड ब्रेक व्हॅनसह 5 सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे असतील.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-सोलापूर सुपरफास्ट वन वे स्पेशल 02105 एकेरी विशेष गाडी रविवार 03-12-2023 रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून00.30 वाजता सुटेल आणि सोलापूर येथे त्याच दिवशी 08.10 वाजता पोहोचेल. या गाडीला दादर, ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे, दौंड आणि कुर्डूवाडी हे थांबे असतील.या गाडीत 17 डबे असतील. त्यात एक द्वितीय वातानुकूलित, तीन तृतीय वातानुकूलित, 8 शयनयान, 2 गार्ड ब्रेक व्हॅनसह 5 सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे असतील.

02103 आणि 02105 वन-वे स्पेशल ट्रेनसाठी विशेष शुल्कासह बुकिंग 30-11-2023 रोजी सर्व पीआरएस (PRS) स्थानांवर आणि www.irctc.co.in संकेतस्थळावर सुरू होणार आहे. प्रवाशांनी विशेष सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.