परीक्षेच्यावेळी वर्गात झोपलेल्या विद्यार्थ्याला उठवले, शिक्षकावर केला हल्ला

चेन्नईमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. परीक्षा सुरु असताना अमली पदार्थाचे सेवन करुन झोपलेल्या मुलाला शिक्षिकाने उठवले असता . संतापलेल्या विद्यार्थ्याने शिक्षकावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. घटनेनंतर जखमी शिक्षकाला रुग्णालयात दाखल केले असून मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

हा बारावीतला विद्यार्थी असून तिरुवोट्टीयूर येथील भारती नगर येथील रहिवासी आहे. त्याने 21 ऑगस्टपासून शाळेत आला नव्हता आणि सोमवारी तो शाळेत आला. त्याचे वडिल शिक्षकांना भेटून त्यांनी त्याला परीक्षेला बसवण्याची विनंती केली. तो यापुढे असे वागणार नाही असेही त्यांनी आश्वासन दिले. त्याच्या वडिलांच्या विनंतीमुळे आणि तो असे वागणार नाही या आश्वासनामुळे शाळेच्या मुख्याध्यापकांनी त्याला परिक्षेला बसण्याची सोमवारी परवानगी दिली. साधरण 3.35 च्या सुमारास विद्यार्थी परिक्षेचता पेपर लिहीण्यात गुंग असताना वर्गशिक्षिका एम सेकर (46) या त्यावेळी सुपरवायझिंग करत होत्या. त्यावेळी हा विद्यार्थी झोपलेला दिसला.

त्यामुळे त्या शिक्षिका त्याच्याजवळ गेल्या आणि त्याला उठवले. त्यावेळी शिक्षेकेचे त्याच्या शेजारी अमली पदार्थाचा खाली पॅकेट दिसले. मुलगा जेव्हा उठला त्यावेळी शिक्षिकेने त्या पाकीटाबाबत विचारले तर त्याने शिक्षिकेशी वाद घातला आणि तो संतापला आणि शिक्षिकेवर त्याने हल्ला केला आणि शाळेच्या मुख्याध्यापकांकडे तक्रार करण्यासाठी जात असताना त्याच्यावर हल्ला केला. सेकर खाली पडून त्यांच्या नाकाला आणि डाव्या डोळ्याला दुखापत झाली. जखमी सेकरला थिरुवोटीयुर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले असता, पोलिसांनी मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेतले. पुढील तपास सुरू आहे.