अदानी विरोधातील मोर्चाला सर्वपक्षीय पाठिंबा

धारावीकरांच्या रक्षणासाठी शिवसेनेने उभारलेल्या लढय़ात इंडिया आघाडीतील घटक पक्षांनीही आपला सक्रीय सहभाग नोंदवला. या लढय़ाला सर्वपक्षीयांनी बिनशर्त पाठिंबा दिला असून काँग्रेस, राष्ट्रवादीसह 15 हून अधिक पक्ष, संघटना, संस्था या महामोर्चात सहभागी झाल्या आहेत. धारावी टी-जंक्शन ते ‘बीकेसी’तील अदानीच्या कार्यालय असा हा मोर्चा असणार आहे.