डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाचा आज निकाल

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली असून उद्या निकाल जाहीर करण्यात येणार आहे. डॉ. दाभोलकर यांच्या हस्त्येच्या 10 वर्षांनंतर हे प्रकरण निकाली निघणार असल्याने अवघ्या महाराष्ट्राचे उद्याच्या निकालाकडे लक्ष लागले आहे.

पुण्यातील महर्षी शिंदे पुलावर 20 ऑगस्ट 2013 रोजी डॉ. दाभोलकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या गोळीबारामध्ये डॉ. दाभोलकर यांचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेनंतर राज्यभरात खळबळ उडाली होती. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येचा सुरुवातीचा तपास पुणे पोलिसांनी केला. त्यानंतर एटीएसने हा तपास पुढे सुरू ठेवला. त्यानंतर एटीएसकडून हा तपास पेंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) वर्ग करण्यात आला.

– या प्रकरणी डॉ. विरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, संजीव पुनाळेकर, विक्रम भावे यांच्यावर आरोप निश्चित करण्यात आले आहेत.