‘जवान’ सिनेमाच्या प्रदर्शनाआधीच शाहरुख खानला झटका, ट्विटरवर सिनेमा होतोय बॉयकॉट

बॉलीवूड किंग खान शाहरुख खानचा बहुचर्चित जवान सिनेमा प्रदर्शनापूर्वीपासूनच चर्चेत आहे. अॅडव्हान्स बुकींगही झाली आहे. सिनेमाच्या प्रदर्शनाला अवघे काही तास शिल्लक असताना आता ट्विटरवर हा सिनेमा बॉयकॉटचा ट्रेण्ड सुरु झाला आहे. ट्वीटरवर जवानच्या बॉयकॉटचा हॅशटॅग करत सिनेमा बॉयकॉट करण्याचे ट्वीट करत आबेक, हा ट्रेण्ड सुरु झाल्यापासून काही सिनेमाचे समर्थन तर काही विरोध करत आहेत.

उद्या 7 सप्टेंबर रोजी देशासह जगभरात हा सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित केला जाणार आहे. मात्र अवघा एक दिवस शिल्लक असताना बॉयकॉट सुरु केले आहे. वेगवेगळी लोकं वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत हा सिनेमा बॉयकॉट करण्याबाबत बोलत आहेत. मात्र या ट्रेण्डचा किती परिणाम होणार हे सांगू शकत नाही. या सिनेमाबाबत लोकांमध्ये क्रेझ असून या सिनेमाच्या प्रदर्शनाची उत्सुकतेने वाट पाहत होते. या सिनेमान 10 लाख अॅडवान्स बुकींग झाली आहे.,

ट्विटरवर बॉयकॉट जवान मूव्ही नावाचे हॅशटॅग सुरु आहे. हे हॅशटॅग वापरुन एका ट्विटर युजरने लिहीलेय, आमचे मंदिर तुमच्या सिनेमाच्या सिनेमाच्या प्रमोशनचा स्टुडिओ नाही. सिनेमाच्या प्रदर्शनाआधीच तुला हिंदू मंदिर कसे काय आठवते? हा मूर्खपणा बंद कर. एका बाजूला लोकं सिनेमाला बॉयकॉट करण्याबाबत बोलत आहेत तर दुसऱ्या बाजूला अनेक युजर्स या बॉयकॉट ट्रेण्डची गंमत उडवत आङेत. तर अन्य एका युजरने लिहीले की, या ट्रेण्डला माझा पूर्णपणे पाठिंबा आहे. सर्व लोकं सर्व हॉलची तिकीटे बुक करा. अशातच तिकीट न मिळाल्याने कोणीही सिनेमा पाहायला जाऊ शकणार नाही.