साडेबारा हजार हेक्टरवरील पिकांवर फिरवला नांगर, नगर जिल्ह्यातील शेतकरी मेटाकुटीला

गेल्या महिनाभरापासून पाऊस नसल्यामुळे नगर जिह्यातील खरीप हंगामातील पिकांची स्थिती दिवसेंदिवस खराब होत आहे. पिकांना पाणी नसल्याने डोळ्यांदेखत करपून जाणारी पिके पाहण्यापेक्षा ती मोडलेली बरी, असा विचार करीत जिह्यातील साडेबारा हजार हेक्टरवरील पिकांवर शेतकऱयांनी ‘नांगर’ फिरवला आहे. कृषी विभागाने संकलित केलेल्या आकडेवारीवरून ही वास्तव परिस्थिती समोर आली आहे.

यंदा पावसाने चांगलाच दणका दिला आहे. जून आणि जुलै महिन्यात नगर जिह्यात जेमतेम पाऊस झाला. त्यानंतर ऑगस्ट महिना कोरडा गेला. यामुळे खरीप हंगामात पेरणी केलेल्या पिकांची स्थिती बिकट झाली आहे. साधारणपणे ऑगस्टअखेर जिह्यात 59 महसूल मंडळांत 21 दिवसांपेक्षा अधिक दिवस पाऊस पडलेला नाही. यामुळे खरीप हंगामातील पिकांच्या उत्पादनावर 50 ते 95 टक्के परिणाम होणार आहे. यात मूग, उडीद, सोयाबीन, मका, कपाशी, बाजरी, तूर, खरीप हंगामातील भुईमूग आणि कांदा पिकांचा समावेश आहे.

पाऊस पडेल, या आशेवर असणाऱया शेतकऱयांचा आता भ्रमनिरास झाला आहे. पावसाअभावी डोळ्यासमोर जळून जाणारी उभी पिके पाहत बसण्यापेक्षा शेतकऱयांकडून त्यावर नांगर फिरवला जात आहे. जिह्यात 12 हजार 300 हेक्टरवरील पिके शेतकऱयांनी मोडून टाकली आहेत. पिके मोडून टाकण्याचे प्रमाण सर्वाधिक पारनेर तालुक्यात आहे. पारनेर तालुक्यातील 6 हजार 482 हेक्टर, कोपरगाव तालुक्यातील 1 हजार 650 आणि श्रीगोंदा तालुक्यातील 1 हजार 105 हेक्टर पिके शेतकऱयांनी मोडून टाकली आहेत. उर्वरित तालुक्यात पाऊस नसल्याने पिकांच्या उत्पादनात 50 टक्क्यांपेक्षा अधिक घट येणार असल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. जिह्यातील 97 महसूल मंडलांपैकी 60 पेक्षा जास्त महसूल मंडलातील पिकांची स्थिती बिकट आहे.

तालुकानिकाय पीक मोडलेले क्षेत्र

 नगर 900 हेक्टर, z पारनेर 6 हजार 482 हेक्टर, z श्रीगोंदा 1 हजार 105 हेक्टर, z श्रीरामपूर 321, z नेवासा 370 हेक्टर, z अकोले 303 हेक्टर, z कोपरगाव 1 हजार 650 हेक्टर z राहाता 65 हेक्टर.

पावसाचा खंड असणारी महसूल मंडले

नगर- वाळकी, चास, रुईछत्तीसी. पारनेर- पारनेर, भाळवणी, सुपा, वाडेगव्हाण, वडझिरे, टाकळी, पळशी. श्रीगोंदा- श्रीगोंदा, काष्टी, मांडवगण, बेलवंडी, पेडगाव, चिंभळा, देवदैठण. कर्जत- कर्जत, राशिन, कोंभळी, माहीजळगाव. जामखेड- अरणगाव, खर्डा. शेवगाव- शेवगाव, बोधेगाव, एरंडगाव. पाथर्डी- पाथर्डी. नेवासा- नेवासा खु., सलाबतपूर, कुकाणा, वडाळा. राहुरी- राहुरी, सात्रळ, ताराहाबाद, टाकळीमियाँ, वांबोरी. संगमनेर- संगमनेर, आश्वी, शिबलापूर, तळेगाव, समनापूर, घारगाव, डोळसणे, साकूर, पिंपरणे. अकोले- वीरगाव, समशेरपूर. कोपरगाव- कोपरगाव, रवंदे, सुरेगाव, दहिगाव, पोहेगाव. श्रीरामपूर- श्रीरामपूर, टाकळीभान. राहाता- राहाता, शिर्डी, बाभळेश्वर, पुणतांबा.