Lok Sabha Election 2024 Voting Update : महाराष्ट्रात 3 वाजेपर्यंत 42.63 टक्के मतदान

महाराष्ट्रातील लोकसभेच्या 11 जागांसह देशभरातील 95 जागांवर आज सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार असून या टप्प्यात शिवसेनेचे पाच शिलेदार मशाल हाती घेऊन निवडणुकीच्या आखाडय़ात उतरले आहेत. वाचा लाईव्ह अपडेट…

  • महाराष्ट्रात 3 वाजेपर्यंत 42.63 टक्के मतदान

  • उद्योगपती गौतम अदानी यांनी सहकुटुंब मतदान केले

  • महाराष्ट्रात 11 वाजेपर्यंत 18.18 टक्के मतदान

  • महाविकास आघाडीचे माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील मोहिते- पाटील यांनी आपल्या कुटुंबियांसह मतदानाचा पवित्र हक्क बजावला.

  • काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी कर्नाटकात केले मतदान

  • छत्रपती शाहू महाराजांसह शाही कुटुंबाने बजावला मतदानाचा हक्क

  • छत्रपती संभाजीनगरात उत्साहात मतदानाला सुरुवात, अनेक मतदान केंद्रांवर सकाळपासून रांगा

  • महाराष्ट्रात थंड प्रतिसाद, 9 वाजेपर्यंत 6.64 टक्के मतदान; वेस्ट बंगालमध्ये सर्वाधिक 14.60 टक्के मतदान

  • केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अहमदाबाद येथे बजावला मतदानाचा हक्क

  • राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, बारामती लोकसभेच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी केले मतदान

  • सोलापूर लोकसभेच्या उमेदवार प्रणिती शिंदे, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी बजावला मतदानाचा हक्कhttps://twitter.com/ANI/status/1787671066761924931?s=19
  • अभिनेता रितेश देशमुख याने पत्नी जेनेलिया सोबत केले मतदान

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी मतदान करण्यासाठी अहमदाबाद येथील मतदान केंद्रावर दाखल

  • काँग्रेस नेते अमित देशमुख यांनी पत्नी आदितीसह लातूर येथे बजावला मतदानाचा हक्क

  • बारामती मतदार संघातील खडकवासला येथील वडगाव येथे मतदान सुरू होण्याआधी पासून मतदान केंद्रावर रांगा