पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानिमित्तशाळांना सुट्टी

प्रातिनिधिक फोटो

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त मंगळवारी 1 ऑगस्ट रोजी शहराच्या मध्यभागातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे डेक्कन एज्युकेशन, शिक्षण प्रसारक मंडळीच्या सर्व शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. सोमवारीसुद्धा सकाळच्या वेळेत भरणाऱ्या शाळा झाल्यानंतर दुपारच्या वेळेत भरणाऱ्या शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.

पंतप्रधान मोदी यांचे आगमन मंगळवारी सकाळी शहरात होणार आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात मोदी दर्शन घेणार आहेत. त्यानंतर स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम निमंत्रितासाठी आहे. शिवाजीनगर येथील पोलीस कवायत मैदानावर आयोजित कार्यक्रमात मोदी यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन मोदी करण्यात येणार असून हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. पंतप्रधानाच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मध्यभागातील वाहतूक बदल आणि शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. सोमवारी महिना अखेरमुळे शाळा लवकर सुटल्या. मात्र दुपारी भरणाऱ्या शाळाना सुट्टी देण्यात आली. मंगळवारी मध्यवस्तीतल्या डीई एस, न्यु इंग्लिश स्कुल, एस पी एम, नु. म. वी मुलींची या शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे.