मराठा आरक्षणासाठी 16 किंवा 17 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन

मराठा आरक्षणावर निर्णय घेण्यासाठी येत्या 16 किंवा 17 फेब्रुवारी रोजी मुंबईत विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवण्यात येणार आहे. या अधिवेशनात मराठा आरक्षणासाठी स्वतंत्र कायदा करण्यात येणार आहे. मराठा आरक्षणावर विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवण्याच्या निर्णयावर आता अंतिम शिक्कामोर्तब झाले आहे. राज्य मागासवर्ग आयोगाचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून हा अहवाल येत्या 15 फेब्रुवारीपर्यंत येण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर पुढील दोन दिवसांत विशेष अधिवेशन बोलवण्याचा निर्णय झाल्याचे मंत्रालयातील उच्चपदस्थ अधिकाऱयांनी सांगितले.