गद्दार घराणेशाहीच्या मुळावरच घाव घालायला आलोय!! उद्धव ठाकरे यांचे जबरदस्त तडाखे

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात फेऱया सुरू झाल्यात. काल ते महाराष्ट्रात येऊन गेले. या महिन्यात ते पुन्हा एकदा येणार आहेत. संक्रांत उद्यापासून आहे, पण कालपासूनच महाराष्ट्रात तिळगुळाचे लाडू वाटून गोड गोड बोलायला सुरुवात झाली आहे. कारण निवडणुका जवळ आल्या आहेत. मोदींना निवडणुकांसाठी महाराष्ट्र लागतो, पण व्यवसायासाठी मात्र गुजरातच आठवतो, असे जबरदस्त तडाखे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगावले. उद्धव ठाकरे यांनी आज कल्याण लोकसभा मतदारसंघाचा सात तास झंझावाती दौरा केला. ठिकठिकाणच्या शाखांना भेटी देत शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मोदींचे महाराष्ट्र दौरे, गुजरातला पळवले जाणारे महाराष्ट्रातले उद्योग, भाजपची वापरा आणि फेकून द्या नीती व मिंध्यांच्या गद्दारीवर आसुड ओढले.

उद्धव ठाकरे यांनी आज कल्याण लोकसभा मतदारसंघातील अंबरनाथची टिळकनगर शाखा, ग्रामीण भागातील नेवाळी शाखा, उल्हासनगर शाखा, कल्याण पूर्वची कोळसेवाडी शाखा, डोंबिवली पूर्व आणि पश्चिम शाखा, कल्याण ग्रामीण मतदारसंघातील दिवा, मुंब्रा आणि कळवा येथील शिवसेना शाखांना मॅरेथॉन भेटी दिल्या. दुपारी 12 ते रात्री 8 वाजेपर्यंत हा झंझावाती दौरा सुरू होता. प्रत्येक शाखेत त्यांनी शिवसैनिकांच्या गाठीभेटी घेत त्यांच्याशी संवाद साधला. ठिकठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. संपूर्ण लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे यांचे फटाक्यांची आतषबाजी, अभूतपूर्व उत्साह आणि गगनभेदी घोषणा देत शिवसैनिकांनी जंगी स्वागत केले. प्रत्येक ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या छोटेखानी सभाच झाल्या.

गद्दार घराणेशाहीच्या मुळावर घाव घालायला आलोय..

पंतप्रधान मोदी यांनी शुक्रवारी नाशिक येथील सभेत घराणेशाहीवर हल्ला केला. तोच धागा पकडून उद्धव ठाकरे म्हणाले, त्यांचा जर खरोखरच घराणेशाहीला विरोध असेल तर गद्दारांच्या घराणेशाहीचे तिकीट मोदीच कापतील. कारण वापरा आणि फेकून द्या हे भाजपचे धोरण आहे. त्यामुळे हे गद्दार केराच्या टोपलीत जातीलच.. आणि नाही गेले तर येत्या निवडणुकीत जनताच त्यांना केराच्या टोपलीत भिरकावून देईल. कारण गद्दार घराणेशाहीच्या मुळावरच घाव घालायला मी इथे आलोय.

नवी मुंबई विमानतळाला अजून दि.बां.चे नाव का नाही?

आज दि.बा. पाटल यांची जयंती आहे. मी मुख्यमंत्री असताना मंत्रिमंडळ बैठकीत नवी मुंबईच्या विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव द्या असे जाहीर केले. मिंधेंने त्यावेळी नाटक केलं होतं. ते माझ्या गळ्यात टाकायला गेले. त्यांना वाटलं या विमानतळाला बाळासाहेबांचं नाव दिलंय. मग दि.बां.चं नाव आल्यावर काय? मी स्पष्टपणे सांगितले, स्थानिक लोकांची मागणी आहे आणि मी त्यांच्यासोबत आहे. (प्रचंड टाळ्या) आज जवळपास दीड वर्ष उलटून गेलं दि.बा. पाटलांच्या नावाचा अजून पत्ता नाही. संभाजी नगरच्या विमानतळाला छत्रपती संभाजीनगर विमानतळ असे नाव द्या असे मी जाहीर केले, त्याचाही अजून पत्ता नाही.

मधमाश्यांच्या पोळ्यावर दगड मारू नका

उद्धव ठाकरे यांनी भाजपला इशाराच दिला. ते म्हणाले, खबरदार.. शिवसैनिकांना डिवचू नका. कारण मधाचं पोळं चांगलं असतं तेव्हा मध मिळते. जो तुम्ही आजपर्यंत चाखलत. पण मधाच्या पोळ्यावर दगड मारल्यावर काय होतं हे तुम्हाला मधमाश्यांसारखे चवताळलेले शिवसैनिक दाखवून देतील, हे याद राखा असा इशारा त्यांनी दिला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

मोदीजी.. अंबरनाथच्या शिवमंदिरासमोरील नाला तुमच्या जादुई झाडूने साफ करा

उद्धव ठाकरे यांनी अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिरास भेट देऊन महादेवाचे दर्शन घेतले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी काळाराम मंदिरात स्वच्छ असलेली लादी हातात झाडू घेऊन पुन्हा साफ करण्याचा इव्हेंट केला होता. हाच धागा पकडून उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले, मोदीजी.. माझी तुम्हाला एक विनंती आहे कारण मिंधेंकडून ते घडणार नाही. अंबरनाथच्या शिवमंदिरासमोरील दुर्गंधीयुक्त नाला तुमच्या ‘जादू’च्या झाडूने साफ करा. त्यामुळे शिवभक्तांना मोठा दिलासा मिळेल.

मिंधेंना साफसफाईची सवय.. त्यांना साफ करा

हल्ली वृत्तवाहिन्या आणि सोशल मिडियावरून फोटो पटापट व्हायरल होतात. ते मिंधे तिथे दिल्लीत जाऊन लादी पुसतात, धुणीभांडीही करतात. पण परवा त्यांचा ठाण्यातील मंदिर साफसफाई करतानाचा फोटो व्हायरल झाला. सगळचं थोतांड.. ती लादी एकदम चकचकीत, स्वच्छ आहे. उलट तेच स्वतःची पावलं उमटवून घाण करताहेत. आता साफसफाईचे थोतांड करणाऱया मिंधेंनाच साफ करा असे फटकारे उद्धव ठाकरे यांनी लगावले.

अंबरनाथ गद्दारांना गाडणारच

अंबरनाथ म्हणजे आमच्या सीताराम भोईरांचे गाव. भोईर म्हणजे एक निष्ठावान साधा शिवसैनिक. एक साधा शिवसैनिक गद्दाराला पाडू शकतो हे त्यांनी त्यावेळी दाखवून दिले. काहींना वाटतंय कल्याण लोकसभा म्हणजे बाप की जहागीरदारी आहे. त्यावेळी निष्ठावंतांना नाकारून गद्दार घराणेशाहीला तिकीट दिलं, ती माझी चूक होती. ती मी सुधारतोय.. तुम्हीही सुधारा. ज्यांनी भगव्याशी गद्दारी केली त्यांना गाडणारा हा मतदारसंघ आहे. त्यामुळे इथल्या गद्दारांना गाडल्यानंतर विजयाची पहिली सभा अंबरनाथच्या शिवमंदिरासमोर घेईन असे उद्धव ठाकरे म्हणाले.

यावेळी शिवसेना नेते खासदार राजन विचारे, शिवसेना सचिव वरूण सरदेसाई, उपनेते विजय साळवी, उपनेत्या ज्योती ठाकरे, कल्याण लोकसभा संपर्कप्रमुख गुरुनाथ खोत, ठाणे जिल्हा संपर्कप्रमुख मधुकर देशमुख, ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे, डोंबिवली जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, माजी महापौर रमेश जाधव, कल्याण जिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, कल्याण महिला जिल्हा संघटक विजया पोटे, ठाणे महिला जिल्हा संघटक समिधा मोहिते, रेखा खोपकर, कल्याण जिल्हा समन्वयक धनंजय बोडारे, उपजिल्हाप्रमुख हर्षवर्धन पालांडे, राजेंद्र शाहू, पिंकी भुल्लर, ठाणे शहरप्रमुख प्रदीप शिंदे, कल्याण शहरप्रमुख शरद पाटील, विवेक खामकर, प्रकाश तेलगोटे, सचिन बासरे, तात्या माने, किशोर मानकामे, नारायण पाटील, प्रकाश जाधक, हेमंत चौधरी, राम ओकळ, किकेक बर्के, संतोष घुगे, योगेश कोरडे, किरण निचळ, राहुल म्हात्रे, अभिजीत थरकळ, शांताराम दिघे, श्याम चौगुले, ओमनाथ नाटेकर योगेश निमसे, महीला संघटक कैशाली दरेकर, ककिता गाकंड, ममता घाडीगांककर, आशा रसाळ, राधिका गुप्ते, अंबरनाथ विधानसभाप्रमुख राजेश वानखेडे, उल्हासनगर शहरप्रमुख कैलास तेजी, अंबरनाथ शहरप्रमुख (पश्चिम) ऍड. संदीप पगारे, अंबरनाथ शहरप्रमुख पूर्व अजित काळे, निशिकांत राऊत, रमेश डोंगरे, भाऊ म्हात्रे, डॉ. जानू मानकर, जया तेजी, मंगला पाटील, चंद्रशेखर यादव, राजू माने, भगवान मोहिते, दिलीप मिश्रा, शिवाजी जावळे, राजन वेलकर, मधुकर साबळे, सुरेंद्र सावंत, दिलीप मालवणकर, सुनीता गव्हाणे, प्रिती भोसले, सुरेखा बिविलकर, सुनिता साबळे, प्रतिभा कालेकर, कैलास बेहरे, रमेश निकम, अंजली राऊत, रेश्मा काळे, दीपमाला भोईर, प्रतिभा जाधव, विजय महाडिक, अरविंद निकम, सुनील चक्हाण, संदीप शिंदे, शिकाजी पार्टे, निलेश चौधरी, दत्ता महाजन, बिपीन देहरकर, महेश मधीकले, प्रदीप गोळतकर, अर्चना काकचोरे कर्षा जाधक, मेघा मोरे, कृषाली जंगम, प्रतिभा आगकले, अशा गकारे, मलप्पा मंचेकर, दिवा शहरप्रमुख सचिन पाटील, अंकिता पाटील, दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे, अभिषेक ठाकूर, योगिता नाईक, ज्योती पाटील, तेजस पोरजी, वैष्णव पाटील, प्रियांका सावंत, उमेश राठोड, विजय देसाई, संतोष जाधव, कल्पना कवळे, संतोष कवळे, मृणाल यज्ञेश्वर, रवींद्र सुर्वे यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

हुकूमशाहीवर संक्रांत येणारच

मोदींनी काल महाराष्ट्रात येऊन साफसफाई केली. अगदी कारपेटसुद्धा साफसूफ केलं, पण त्यांची साफसफाई आता महाराष्ट्रच करणार आहे. भाजप आणि गद्दारांना केराच्या टोपलीत टाकणार आहे. हुकूमशाहीवर संक्रांत येणार हे नक्कीच. आणि रामाचे जे मंदिर उभं राहतंय त्यानिमित्ताने हे पवित्र काम करणारच अशी प्रतिज्ञा आम्ही केली आहे, असा निर्धार उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

कल्याण पूर्व कोळसेवाडी शाखेसमोर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत, खासदार राजन विचारे, शिवसेना सचिव वरुण सरदेसाई, उपनेते विजय साळवी आदी उपस्थित होते.

आता माझ्याआधी शिवनेरीला जा..

प्रभु रामचंद्रांची आरती करण्यासाठी नाशिकच्या काळाराम मंदिरात जाणार आहे असे मी सांगितले. त्यानंतर काल मोदी काळाराम मंदिरात जाऊन आले. अयोध्येत जाताना मी शिवनेरीची पवित्र माती घेऊन गेलो होतो. आज मी जाहीर करतो की 22 तारखेच्या आधी जमले तर मी शिवनेरीला जाणार आहे. त्यामुळे मोदींनी माझ्याआधी शिवनेरीला जाऊन महाराष्ट्राच्या तेजाला वंदन करावे असा उपरोधिक टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.

शंकराचार्यांचे योगदान विचारणाऱया भाजपला लाज वाटत नाही?

राम मंदिराच्या उद्घाटनास न जाण्याची स्पष्ट भूमिका घेणाऱया शंकराचार्यांचे हिंदू धर्मात योगदान काय, असे केंद्रीयमंत्री नारायण राणे बरळले. त्याचा उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला. ते म्हणाले यांना लाज वाटत नाही काय? एक तर फक्त स्वतःचे फोटो छापता आहात मोदींची गॅरंटी म्हणून… शंकराचार्यांचा मान तुम्हाला राखायचा तर नाहीच वर शंकराचार्यांचे हिंदू धर्मात योगदान काय असे विचारता? तुमची लायकी तरी काय? आणि तुमच्या सोबत आम्ही हिंदुत्वासाठी युती करायची? शंकराचार्यांचे हिंदू धर्मात योगदान विचारणाऱया भाजपने आधी हिंदूंची माफी मागावी, अशी जोरदार मागणी उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली.

‘दिवा’ इतका भडकतो.. निवडणुकीत मशाल पेटल्यावर काय होईल..

उद्धव ठाकरे यांनी दिव्यातील आगासन गाव आणि दिवा चौक येथील शाखांना भेट देऊन शिवसैनिकांशी संवाद साधला. ते म्हणाले, आज दिव्यात ही तुफान गर्दी दिसते. आज फक्त दिव्याला भेट दिली, तर तो इतका भडकला. उद्या निवडणुकीत मशाल पेटली तर काय होईल? ‘दिवा’ पेटलाय.. ‘कळवा’त्यांना असे उद्धव ठाकरे यांनी सांगताच गगनभेदी घोषणा घुमल्या. निवडणुका आल्या की, दिव्यात दरवर्षी दहा एमएलडी पाणी वाढवण्याच्या घोषणा होतात. पण नागरिकांना पाणी मिळत नाही. 221 कोटींची पाणी योजना झाली.. पण तुम्हाला मुबलक पाणी मिळाले का? असा सवाल करतानाच दिव्याच्या पाणी टंचाईला जबाबदार असणाऱया मिंधे गटाला पाण्यात बुडवा असे तडाखेही उद्धव ठाकरे यांनी लगावले.

शिवसेनेवर दरोडा घालणाऱयांचा सूड घ्या – संजय राऊत

उद्धव ठाकरे यांच्या कल्याण, डोंबिवलीतील स्वागताचे फटाके संपूर्ण महाराष्ट्रात ऐकू गेले आहेत. उद्धव ठाकरे हेच अंगार आहेत.. बाकी सगळे भंगार आहेत. हा भंगारच आपल्याला संपवायचा आहे असे सांगतानाच शिवसेनेवर दरोडा घालणाऱयांचा सूड घ्या असे जबरदस्त आवाहन शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केले.
शिवसेनेची स्थापना बाळासाहेब ठाकरे यांनी 60 वर्षांपूर्वी केली तेव्हा शिवसेना आणि धनुष्यबाणाची चोरी करून हा पक्ष आमचाच असे सांगणारे गद्दार गोधडीत सुद्धा नव्हते. कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघ हा परंपरेने हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, कुणाची जहागिरी नाही. त्यामुळे कोण गेले, कोण पळाले, कोण कुठल्या बिळात गेले त्यापेक्षा हजारोंच्या संख्येने उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी ठामपणे जे उभे ठाकलेत तेच निष्ठावंत शिवसैनिक. आणि याच शिवसैनिकांच्या जोरावर बाळासाहेबांची शिवसेना याहीपेक्षा अधिक ताकदीने आणि जोमाने पुढे जाईल असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला. आमची घराणेशाही महाराष्ट्राच्या, मराठी माणसाच्या स्वाभिमानाची, हिंदुत्त्वाच्या विचारांची आहे. ही घराणेशाही पुढे घेऊनच शिवसेना चालली आहे. ही गुलामीची, गद्दारीची घराणेशाही महाराष्ट्रात, शिवसेनेत चालणार नाही असे तडाखेही खासदार राऊत यांनी लगावले. एका बाजूला सत्ता, झुंडशाही आणि पोलिसांचा मारा अशा कठीण परिस्थितीत शिवसैनिक इथे पाय रोवून उभा आहे, आता तर न्यायसुद्धा विकत घेतला जातोय. पण हा जोश आणि निष्ठा भाडय़ाने मिळत नाही हे शिवसैनिकांनी दाखवून दिले आहे. हीच बाळासाहेबांना अपेक्षित असलेली शिवसेना आहे आणि राहील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

फटकारे

  • लोकशाहीचे युद्ध म्हणजे निवडणूक. निवडणूक म्हटली की दारुगोळा आणि शस्त्र हवीतच. माझी ही शस्त्र किती लखलखती आहेत आणि दारुगोळा किती मजबूत ठासून भरला आहे हे मी निष्ठावंत शिवसैनिकांच्या रुपाने आज पाहतोय. या दारुगोळा आणि शस्त्रांसमोर गद्दारांचे बुरूज उध्वस्त होतील.
  • पक्ष चोरणाऱयांचे काय करायचे हे सर्वांनाच माहिती आहे. चोरांच्या हातात धनुष्यबाण आणि शिवसैनिकांच्या हातात मशाल.. होऊन जाऊ द्या..
  • आम्ही हिंदुत्त्व कधीही सोडणार नाही. पण दलाली विचार पुढे घेऊन जाणाऱयांचे बेगडी हिंदुत्त्व आम्ही कदापी मान्य करणार नाही. त्यामुळेच देशभरात आम्ही इंडिया म्हणून निवडणुकीला सामोरे जात आहोत.