पश्चिमरंग – दी लार्क अॅसेंडिंग

>> दुष्यंत पाटील

‘दी लार्क अॅसेंडिंग’ ही मेरडिथ या कवीने 1881 मध्ये रचलेली 122 ओळींची कविता. लार्क पक्षी अतिशय उत्साहाने आकाशात विहार करताना आनंदाचे गीत गातो अशी कल्पना यात आहे. वॉन विल्यम्स या इंग्रज संगीतकाराने 1914 मध्ये व्हायोलिन आणि पियानो या वाद्यांनी या कवितेवर संगीत रचना केली. तेव्हापासून आजपर्यंत या संगीतरचनेचे खूप वेळा रेकॉर्डिंग करण्यात आले. आजही पसंतीच्या रचनांमध्ये ही रचना प्रथम क क्रमांकावर असते.

युरोपमध्ये (आणि रशियाच्या पश्चिम भागात) ‘लार्क’ नावाचा एक पक्षी आढळतो. हा पक्षी काहीसा चिमणीसारखा दिसतो. चिमणीपेक्षा किंचितसा मोठा असला तरी याचे वजन 45 ग्रॅमपेक्षा जास्त नसते. या पक्ष्याची खासियत म्हणजे या पक्ष्याचा कर्णमधुर चिवचिवाट. हा पक्षी हवेतून उडताना अतिशय मधुर आवाजात चिवचिवाट करतो. हा आवाज इतका मोहक असतो की, पाश्चात्य लोक हा पक्षी ‘गातो’ असे म्हणतात.

लार्क पक्ष्यामुळे इंग्रज कवी मोहीत झाले नसते तरच नवल! विल्यम वर्डस्वर्थ, शेलीसारख्या कित्येक विख्यात कवींनी लार्कवर कविता रचल्या. लार्क पक्षी अतिशय उत्साहाने आकाशात विहार करताना आनंदाचे गीत गातो अशी कल्पना कवींनी केली. शेक्सपिअरने लार्क हे आनंदाचे प्रतीक मानले. लार्क पक्ष्यामुळे मोहीत होऊन त्यावर कविता लिहिणाऱया इंग्रज कवींपैकी एक कवी होता जॉर्ज मेरडिथ. त्याच्या ‘लव्ह इन दी व्हॅली’ नावाच्या कवितेत लार्क पक्ष्याचा मधुर चिवचिवाट ऐकताना प्रियकराने प्रेयसीचा हात पकडल्याचे वर्णन येते. त्याने लिहिलेली ‘दी लार्क अॅसेंडिंग’ नावाची कविता खूप गाजली.

‘दी लार्क अॅसेंडिंग’ ही 122 ओळींची कविता आहे. मेरडिथने ही कविता 1881 मध्ये रचली. या कवितेत आकाशातून आनंदाने विहार करणाऱया लार्कला खाली जमिनीवर दिसणाऱया सृष्टीचे वर्णन येते. मेरडिथच्या कल्पनेप्रमाणे माणसाला आपला आनंद, आशा आपल्या आवाजात व्यक्त करता येत नाहीत. त्यामुळे माणूस लार्कच्या आवाजात आपला आनंद व्यक्त होताना पाहतो.

विसाव्या शतकात वॉन विल्यम्स या इंग्रज संगीतकाराला मेरडिथच्या ‘दी लार्क अॅसेंडिंग’ कवितेने भुरळ पाडली. विल्यम्सला साहित्य आणि काव्याची खूप आवड होती. मेरडिथ हा त्याच्या आवडत्या कवींपैकी एक होता. विल्यम्सने 1914 मध्ये व्हायोलिन आणि पियानो या वाद्यांवर एकत्र वाजवण्यासाठी ‘दी लार्क अॅसेंडिंग’ अशा नावाची रचना केली. विल्यम्सला भावलेले काव्य या संगीतरचनेतल्या व्हायोलिनवादनातून व्यक्त होत होते.

1914 मध्ये पहिल्या महायुद्धाला सुरुवात झाल्याने विल्यम्सची ‘दी लार्क अॅसेंडिंग’ ही रचना लोकांसमोर सादर होऊ शकली नाही. विल्यम्सने पहिल्या महायुद्धात सहभागी होऊन देशसेवा करण्याचा निर्णय घेतला. युद्धात भाग घेण्यासाठी विल्यम्सचे वय या वेळी थोडे जास्त म्हणजे 42 होते. त्याने जखमी सैनिकांना नेण्यासाठी वापरण्यात येणाऱया आम्ब्युलन्स चालवण्याचे काम केले. त्याने सुरुवातीला फ्रान्समध्ये, तर नंतर ग्रीसमध्ये हे काम केले. युद्धातल्या गोळीबाराचा सतत आवाज ऐकून विल्यम्सच्या कानांवर वाईट परिणाम झाला. उतारवयात त्याला बराचसा बहिरेपणा आला तो त्याच्या पहिल्या महायुद्धातल्या सहभागामुळेच.

पहिले महायुद्ध संपल्यावर विल्यम्स पुन्हा एकदा आपल्या ‘दी लार्क अॅसेंडिंग’ या रचनेकडे वळला. त्याने सुरुवातीला केलेली रचना ही व्हायोलिन आणि पियानो यांच्यासाठी होती, पण आता या रचनेवर पुन्हा काम करून त्याने व्हायोलिन आणि संपूर्ण ऑर्केस्ट्रा यांच्यासाठी ही रचना नव्याने लिहिली. त्याने ही रचना मेरी हॉल नावाच्या प्रसिद्ध व्हायोलिनवादिकेला समर्पित केली. ही रचना लोकांसमोर सादर होण्यापूर्वी विल्यम्सने मेरी हॉल हिच्यासोबत संगीतात काम केले होते. मेरीने विल्यम्सला या रचनेवर काम करताना काही मोलाच्या सूचना केल्या होत्या असे मानले जाते.

1921 मध्ये ब्रिटिश म्युझिक सोसायटीने लंडनमधल्या प्रसिद्ध ‘क्वीन्स हॉल’मध्ये आयोजित केलेल्या संगीताच्या कार्पामात ही रचना पहिल्यांदा सादर झाली. ही रचना सादर होताना मेरीने व्हायोलिनवादन केले. खरे तर या कार्पामात सादर होणाऱया संगीताचे मुख्य आकर्षण हे आपण मागच्या एका लेखात पाहिलेले ‘दी प्लॅनेट्स’चे संगीत होते. पण ‘दी लार्क अॅसेंडिंग’ला या कार्पामात श्रोत्यांची उत्स्फूर्त दाद मिळाली.

‘दी लार्क अॅसेंडिंग’च्या संगीतात निसर्गरम्य वातावरण, त्यातली शांतता, लार्कचे मधुर गाणे, त्याला दिसणारी जमिनीवरची दृश्ये या साऱया गोष्टी सुंदरपणे व्यक्त होतात. ही संगीतरचना प्रचंडच गाजली. 1928 पासून ते आजपर्यंत या संगीतरचनेचे खूप वेळा रेकॉर्डिंग करण्यात आले. ही संगीतरचना आजही अतिशय लोकप्रिय आहे. इंग्लंडमधल्या ‘क्लासिक एफएम’ या प्रसिद्ध रेडिओ स्टेशनवर 2007 ते 2010, तसेच 2014 ते 2017 या काळात लोकांच्या पसंतीच्या रचनांमध्ये प्रथम ाढमांकावर हीच रचना होती. 2011 मध्ये अमेरिकेवरच्या 11 सप्टेंबरच्या हल्ल्यास 10 वर्षे पूर्ण झाली. या वेळी एका रेडिओ स्टेशनने या हल्ल्याच्या स्मरणार्थ न्यूयॉर्कवासीयांना संगीतरचना निवडायला सांगितली होती. रेडिओ स्टेशनने घेतलेल्या मतदानात श्रोत्यांनी ‘दी लार्क अॅसेंडिंग’ला दुसरी पसंती दिली.

शंभर वर्षांनंतरही विल्यम्सचे हे संगीत इतके लोकप्रिय का असावे हे पाहण्यासाठी आपण ब्दल्tल्ंा वर ऊप त्arक् asमह्ग्हु एकदा तरी ऐकायलाच हवे.