विवाहबाह्य संबंधामध्ये विवाहित पुरुषांवर महिलांची मात

लग्नानंतरही विवाहित पुरुषांचे इतर स्त्रियांसोबत संबंध असल्याच्या अनेक घटना आपण आजवर पाहिल्या आहेत. परंतु ग्लीडन या ऑनलाईन डेटिंग अॅपने नुकत्याच केलेल्या एका सर्वेक्षणातून मात्र वेगळेच वास्तव समोर आले आहे. अहवालानुसार, विवाहबाह्य संबंधांमध्ये महिलांनी पुरुषांना मागे टाकले असून सर्वेक्षण केलेल्या जवळपास 56 टक्के महिलांनी आपले विवाहबाह्य संबंध असल्याचे मान्य केले आहे.

सध्याच्या सोशल मीडियाच्या जमान्यात देशात विवाहबाह्य संबंधांमध्ये मोठी वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर ग्लीडन या डेटिंग अॅपद्वारे मुंबई, दिल्ली, बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, पुणे, कोलकाता आणि अहमदाबाद या शहरांमधील 25 ते 50 वयोगटातील 1525 विवाहित जोडप्यांवर संशोधन करण्यात आले होते. अहवालानुसार, देशातील सुमारे 55 टक्के विवाहित व्यक्तींनी किमान एकदा तरी अफेअर केले आहे तर 49 टक्के विवाहित व्यक्तींनी त्यांच्या जोडीदाराव्यतिरिक्त इतर कोणाशीही प्रेमसंबंध असल्याचे कबूल केले आहे.

देशातील महिला एक्ट्रामॅरिटल अफेअरच्या बाबतीत सर्वात पुढे आहेत. सर्वेक्षण केलेल्या 26 टक्के पुरुषांच्या तुलनेत 41 टक्के महिलांनी त्यांच्या जोडीदाराशिवाय इतर कोणाशीही नियमितपणे लैंगिक संबंध ठेवल्याचे तर 43 टक्के पुरुषांच्या तुलनेत 53 टक्के विवाहित महिलांनी आधीच बाहेर लैंगिक संबंध ठेवल्याचे मान्य केले आहे. 47 टक्के जणांनी आधीच पॅज्युअल सेक्स तर 46 टक्के जणांनी वननाइट स्टॅण्ड केल्याचे समोर आले आहे.

अहवालानुसार, देशात घटस्पह्टाचे प्रमाण जगातील सर्वात कमी आहे. हिंदुस्थानात केवळ एक टक्के घटस्फोट होतात. प्रत्येक एक हजार जोडप्यांपैकी फक्त 13 जोडपी विभक्त होतात. देशातील विवाहांपैकी 90 टक्के विवाह अजूनही अरेंज मॅरेज आहेत आणि फक्त 5 टक्के जोडपी प्रेमविवाह करतात.

लिव्हमिंटच्या अहवालानुसार, 48 टक्के हिंदुस्थांनींना विश्वास आहे की, एकाच वेळी दोन लोकांवर प्रेम करणे शक्य आहे, तर 46 टक्के लोकांना वाटते की, प्रेमात असताना कोणीही फसवू शकते. कदाचित याच कारणामुळे हिंदुस्थानींना त्यांच्या जोडीदाराच्या अफेअरची माहिती मिळाल्यावर त्यांना माफ करण्यास तयार असतात.