अदानीच्या दलालाकडून नागरिकांची दिशाभूल – बाबूराव माने

दलाल आज येथे कार्यरत असून ते नागरिकांची दिशाभूल करत आहेत. मात्र धारावीकरांना 500 चौरस फुटांचे घर देण्यासाठी आम्ही निकराचा लढा देऊ, असे त्यांनी अदानीच्या आणि भाजपच्या दलालांना बजावले. तसेच धारावीची 650 एकर जागा असून त्यामध्ये 300 एकरात पुनर्विकास प्रकल्प, 50 एकरात वेगवेगळय़ा सुविधा आणि उरलेल्या 300 एकरात अदानीने आपला विकास करावा, असे माजी आमदार बाबूराव माने म्हणाले.

70 ते 80 टक्के धारावीकरांना सरकारने अपात्र ठरवले – अॅड. कोरडे

धारावीच्या पुनर्विकासासाठी सरकारने सर्वेक्षण केले आहे. त्यामध्ये 2000 नंतर ज्यांनी झोपडय़ा बांधल्या आहेत त्यांना अपात्र ठरवले आहे. त्यामुळे 70 ते 80 टक्के धारावीकर अपात्र ठरले आहेत. त्यामुळे ते कायमस्वरूपी धारावीतून हद्दपार होणार असल्याची धक्कादायक माहिती ‘धारावी बचाव आंदोलना’चे समन्वयक अॅड. राजू कोरडे यांनी दिली.