एसटीबस सेवा बंदचा साई भक्तांसह प्रवाशांना फटका

राज्यभरातून हजारो साईभक्त दररोज येतात शिर्डीत येतात. मात्र, आज सकाळपासून 98 टक्के बस सेवा बंद असल्याने अनेक भक्तांना शिर्डीला येता आलं नाही तर अनेक भत्तांना बस सुरू नसल्याने परतीच्या प्रवासात अडचणींना सामोरे जावं लागलं आहे. संध्याकाळी सहाच्या दरम्यान शिर्डी मुक्कामी आलेल्या बाहेरील बसेस सोडण्यास सुरुवात झाल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

नगर जिल्ह्यासह राज्यातील अनेक ठिकाणची बससेवा विस्कळीत झाली होती. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एसटी बससेवा बंद असल्याने साई भक्तांना मोठा त्रास झाला असून परतीच्या प्रवास खासगी वाहनाने करावा लागला.