अदानी तुपाशी, धारावीकर उपाशी – विनायक राऊत

धारावीचा पुनर्विकास करत असल्याचे राज्य सरकार सांगत असले तरी त्यामध्ये ‘विकासक अदानी तुपाशी आणि जागा मालक धारावीकर उपाशी’ असेच चित्र असल्याची टीका शिवसेना नेते- खासदार विनायक राऊत यांनी केली.

धारावीच्या पुनर्विकासासाठी सरकार अदानींवर चांगलेच मेहरबान झाले आहे. गेल्या एका वर्षाच्या काळात अदानींच्या फायद्यासाठी सरकारने जेवढे जीआर काढले असतील तेवढे जीआर आतापर्यंत कशासाठीच काढलेले नाहीत. येथील झोपडीधारकांना पाचशे चौरस फुटांचे घर देण्यास आढेवेढे घेणाऱया सरकारने अदानीला छप्पर फाडके दिले आहे. मुद्रांक, नगरविकास, सुधार शुल्क, छाननी शुल्क, वीज बिलावरील जीएसटी अशा वेगवेगळय़ा प्रकारचे शुल्क माफ केले आहे. त्यामुळे सरकार आणि भाजपच्या चमच्यांचा हेतू धारावी विकासाचा नसून अदानी विकासाचा असल्याचा टोला त्यांनी लगावला.