नारायण राणे यांना मराठा आंदोलकांनी दाखवले काळे झेंडे

केंद्रीय मंत्री नारायण राणे हे आज नगरच्या दौऱ्यावर आले असताना सकल मराठा समाजाच्या वतीने त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. या प्रकारामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान आंदोलनकर्त्यांनी या कोंबडी चोरायचं करायचं काय खाली डोकं वर पाय, नारायण राणेंचा धिक्कार असो, एक मराठा लाख मराठा अशा जोरदार घोषणा यावेळी दिल्या. दरम्यान पोलिसांनी कुठलीही अनुचित घटना घडू नये म्हणून अगोदरच काही पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले होते.

केंद्रीय मंत्री नारायण राणे हे एका खाजगी कार्यक्रमासाठी नगरला आले आहेत. राणे यांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये केलेल्या वक्तव्यावरून त्याचे पडसाद उमटणार हे निश्चित होते त्यानुसार आज नगरमध्ये सगळं मराठा समाजाच्या वतीने त्यांना काळे झेंडे दाखवण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात चौका जवळ सर्व आंदोलनकर्ते जमलेले होते, त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन तोफखाना पोलिस ठाण्यात रवाना केले होते.

कोणत्याही परिस्थितीमध्ये आंदोलन करायचं असा निर्धार मराठा क्रांती दलाच्या कार्यकर्त्यांनी घेतलेला होता त्यानुसार त्यांनी चार ठिकाणी वेगवेगळे असे कार्यकर्ते दबा धरून वेगवेगळ्या ठिकाणी बसलेले होते ज्यावेळेला राणे यांच्या गाड्या घेणार हे कळल्यानंतर गनिमी काव्याने त्यांनी हे आंदोलन केले.

आज दुपारी राणे यांचे नगर येथे आगमन झाल्यानंतर ते नगर तालुक्यातील अकोळनेर या गावाच्या ठिकाणी निघाले असतानाच नगरच्या शिल्पा गार्डनच्या जवळ मराठा आंदोलकांनी त्यांना काळे झेंडे दाखवले व जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी दखल घेतली असून पुढील कारवाई सुरू केली आहे.