कस्मे…वादे….प्यार…वफा….27 लाखांचा चुना लावून प्रियकर फरार

अलिकडे सायबर ठगांचे सुळसुळाट वाढला आहे, अशातच आता आणखी एक नवे प्रकरण समोर आले आहे. सिकंदराबाद येथील एका महिला वकिलाशी मैत्री करुन तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला 27 लाखांचा गंडा घातल्याची घटना घडली आहे. महिलेला फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर तिने पोलिसांत धाव घेतली. सध्या पोलीस घटनेचा तपास करत आहेत.

ही तीस वर्षीय महिला वकिल सिकंदराबाद येथील आहे. महिलेचा एका व्यक्तीसोबत फोनवर ओळख झाली. ज्याने त्याचे नाव जावेश सांगितले. त्यानंतर त्याने महिलेसोबत मैत्री केली आणि लग्नासाठी तिला मागणी घातली. त्यानंतर त्याने तो हिंदुस्थानात आल्यावर तिच्याशी लग्न करणार असल्याचे सांगितले. त्याने महिलेची प्रोफाईल मेट्रोमोनिअल साइटवर पाहिली होती. त्यानंतर दोघं एकमेकांसोबत संपर्क वाढला. नंतर त्याने तो काही कामासाठी सिरीयाला जात आहे आणि त्यानंतर तिच्याशी काही बोलणे झाले नाही.  काही दिवसानंतर त्या महिला वकिलाला एक व्हॉट्सअॅप फोन आला, तो जावेशचा होता. त्याच्या बेसवर दहशतवादी हल्ला झाला झाल्याचे त्याने सांगितले. तो तिथून बाहेर पडू इच्छित आहे, मात्र त्याचे बॅंक अकाऊंट फ्रीज केले आहे. त्यासाठी त्याने महिलेकडे मदत म्हणून काही पैशांची मागणी केली. त्याने सांगितले की, हिंदुस्थानात आल्यावर तिच्याशी तो लग्न करु इच्छित आहे आणि तिचे पैसेही पण परत करणार असल्याचे सांगितल्याने महिलेने त्याला मदत केली.

काही दिवसांनंतर तिला पुन्हा फोन येतो. ज्यामध्ये तो व्यक्ती सांगतो की, त्याला मुंबई विमानतळावर अटक केली आहे. तो सिरीयावरुन ,सोनं आणि महागड्या गोष्टी घेऊन येत होता. त्यामुळे त्याला कस्टम टॅक्स भरावा लागणार, त्यासाठीही पैसे त्याने मागितले.  काही दिवसांनी एका डिलिव्हरी बॉयचा महिलेला फोन आला, जो सांगतो तिच्यासाठी एक बॅग आली आहे, ती फार जड असून जावेशने पाठवली आहे. त्यामध्ये त्याने काहीतरी महागड्या भेटवस्तू असल्याचे सांगितले होते. असे करुन त्या महिलेच्या अकाऊंटमधून 27 लाख रुपये ट्रान्सफर करुन घेतले. मात्र महिलेला जावेशवर संशय आला आणि मग तिला तिच्यासोबत साय़बर फ्रॉड झाल्याचे लक्षात आले. अखेर महिला वकिलाने पोलिसात धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी तक्रार दाखल केली. आता पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.