2035 मध्ये पहिले स्पेस स्टेशन तर 2040 मध्ये पहिला हिंदुस्थानी चंद्रावर

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2035 रोजी हिंदुस्थानचे पहिले अंतराळ स्टेशन उभारण्याचा आणि 2040 मध्ये पहिला हिंदुस्थानी चंद्रावर पाठवण्याचे लक्ष्य ठेवण्याच्या सूचना आज मंगळवारी इस्रोच्या वैज्ञानिकांना केल्या. ‘गगनयान मिशन’च्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मोदी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मिशनसंबंधी सर्व महत्त्वपूर्ण माहिती इस्रोच्या वैज्ञानिकांनी पंतप्रधानांना दिली. गगनयान या पहिल्याच अंतराळ मोहिमेअंतर्गत इस्रो 21 ऑक्टोबर रोजी अबॉर्ट मिशन-1 चे प्रक्षेपण करणार आहे. या मोहिमेचा बैठकीत संपूर्ण आढावा घेण्यात आला. चांद्रयान-3 आणि आदित्य एल 1 या मोहिमा यशस्वी झाल्याच्या पार्श्वभूमीवर हिंदुस्थानने आता नवीन महत्त्वाकांक्षी मोहिमा हाती घ्यायला हव्यात असे मोदी बैठकीदरम्यान म्हणाले.