महागाई आणि बेरोजगारी देशासमोरील मोठी आव्हाने -राहुल गांधी

प्रचंड वाढलेली बेरोजगारी आणि महागाई ही देशासमोरील मोठी आव्हाने आहेत, परंतु, प्रसारमाध्यमांमध्ये या मुद्दय़ांना जागा नाही, अशा शब्दांत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी प्रसारमाध्यमांवर नाराजी व्यक्त केली. मध्य प्रदेशातील शिवपुरी येथे भारत जोडो न्याय यात्रेत ते बोलत होते. चीन, पाकिस्तान, क्रिकेट, बॉलीवूड यांसारख्या मुद्दय़ांवर मीडिया जोर देते आणि लोकांचे लक्ष तिकडे वळवते, असेही राहुल गांधी म्हणाले. देशातील मीडिया अब्जाधीशांच्या नियंत्रणाखाली आहे, असा आरोपही राहुल गांधी यांनी केला. अनंत अंबानी यांच्या लग्नाच्या बातम्या मीडियावर 24 तास सुरू होत्या. याशिवाय क्रिकेट आणि बॉलीवूड मंडळींबद्दल दाखवले जाते. परंतु, सर्वसामान्य लोकांच्या 75 टक्के मुद्दय़ांबाबत मीडियात काहीच दाखवले जात नाही, असा आरोपही त्यांनी केला.