‘मिंधे गटाचे 16 आमदार अपात्र ठरतील…’; नरहरी झिरवळांचं मोठं विधान

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दगा देत पक्ष पळवून नेण्याच्या प्रयत्नात असलेल्या मिंधे गटाची धास्ती वाढवणारी बातमी आहे. सर्वोच्च न्यायालयानं राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल देताना आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेण्याचे सर्व अधिकार विधानसभा अध्यक्षांकडे असल्याचं म्हटलं होतं. मधल्या काळात राष्ट्रवादीतही अशीच परिस्थिती झाली. आता विधानसभा अध्यक्षांनी मिंधे गट आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला नोटीसा पाठवल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी मोठं विधान केलं आहे.

अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार, खासदारांना सोबत घेत पक्षावर दावा केला आहे. यानंतर विधानसभा उपाध्यक्ष झिरवळ हे देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह भाजपसोबत गेले आहेत. या दरम्यान, विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या नोटीसच्या पार्श्वभूमीवर नरहरी झिरवळ म्हणाले, सर्व बाजूंचा विचार केला तर शिवसेनेचे 16 आमदार अपात्र ठरतील. मात्र, अंतिम निर्णय हा विधानसभा अध्यक्षांचा असेल, असंही झिरवळ पुढे म्हणाले. झिरवळ यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे. तर मिंधे गटाच्या आमदारांना या विधानानं धडकी भरली आहे.