‘चांद्रयान – 3’च्या लँडरचा ‘चांद्रयान – 2’च्या ऑर्बिटरशी संपर्क स्थापित

चांद्रयान – 3च्या लँडरचा चांद्रयान – 2च्या ऑर्बिटरशी संपर्क स्थापन झाल्याचं वृत्त आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रो यांनी सोमवारी ही माहिती दिली आहे. या लँडरचे 23 ऑगस्ट रोजी नियोजित चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशावर लँडिग नियोजित आहे.

हिंदुस्थान अंतराळ कार्यक्रमाचे जनक डॉ. विक्रम साराभाई यांचे नाव असलेले विक्रम लँडर 14 जुलै रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून LVM3 रॉकेटद्वारे अवकाशात सोडण्यात आले. ते 5 ऑगस्ट रोजी चंद्राच्या कक्षेत दाखल झाले आणि यशस्वीरित्या वेगळे झाले. त्यानंतर आता त्याने चांद्रयान 2 च्या ऑर्बिटरशी संपर्क स्थापन केला आहे.

इस्रोने केलेल्या ट्विटनुसार, स्वागत है दोस्त, चंद्रयान 2 ऑर्बिटरने चंद्रयान 3 च्या विक्रम लँडरचं औपचारिक स्वागत केलं आहे. त्या दोघांमध्ये संवाद स्थापन झाला आहे. एमओएक्सजवळ आता एलएमपर्यंत पोहोचण्यासाठी अधिक मार्ग उपलब्ध आहेत, असं ट्वीट इस्रोने केलं आहे.