शिक्षकाने सातवीतल्या विद्यार्थ्याला लाथा-बुक्क्यांनी मारले, बेशुद्धावस्थेत दाखल केले रुग्णालयात

उत्तरप्रदेशात मुरादाबादमध्ये एक संतापजनक घटना घडली आहे. एका शिक्षकाने सातवीच्या विद्यार्थ्यांला इतके बेदम मारले की तो बेशुद्ध पडला. त्याला तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याच्या हृदयाला दुखापत झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्याचवेळी विद्यार्थ्याच्या नातेवाईकांनी शिक्षकाच्या या कृत्याबाबत स्थानिक पोलिसांकडे तक्रार दिली. कुटुंबीयांच्या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना गुरुवारी घडली आहे. मुलाच्या शाळेतून मुलगा बेशुद्ध झाल्याा फोन आला. शाळेत जाऊन चौकशी केली असता कळले की, गणिताच्या शिक्षकाने त्याला बेदम मारले. याबाबत ज्यावेळी शाळेच्या मुख्याध्यापकांकडे तक्रार केली असता, त्यांनी उलट आम्हाला ठणकावले. घरच्यांनी त्याला तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करून पोलिसांत तक्रार दिल्याचे नातेवाईकांनी सांगितले. पोलिसांनी घटनेची दखल घेत कारवाईचे आश्वासन दिले आहे.

तर दुसरीकडे शाळेत जखमी झालेल्.ा विद्यार्थ्याबाबत माहिती दिल्यानंतर मुख्याध्यापक हेमंत कुमार झा म्हणाले की, विद्यार्थ्याला मारहाण केल्याप्रकरणी शिक्षकाकडून स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. तर आरोपी शिक्षक पुष्कर चौहान म्हणतो की, मुलं खोडसाळपणा करत असल्याने त्याला ओरडलो होतो. त्यामुळे तो मुलगा संतापला. मात्र जसा त्याचा हात धरला तसा तो खाली पडला आणि जखमी झाला.त्यांनी विद्यार्थ्याच्या थोबाडीत मारलेले नाही. शिक्षकाच्या मारहाणीमुळे विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती एसपी शहराकडून देण्यात आली. याप्रकरणी कुटुंबीयांनी तक्रार दिली आहे. तक्रारीची दखल घेत प्रकरणाचा तपास सुरू आहे. संपूर्ण प्रकरणामध्ये कायदेशीर कारवाई केली जाईल.