अयोध्येत कारसेवेसाठी गेलेल्या शिवसैनिकांचा मंचरमध्ये सत्कार

हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अयोध्येत 1990 आणि 1992 मध्ये कारसेवेसाठी गेलेल्या कारसेवक शिवसैनिकांचा शिवसेनेकडून (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सत्कार करण्यात आला. यावेळी कारसेवक, शिवसैनिक उल्हास लोहोट, राजु गुळवे, महादु ठोसर, भिकाजी ठोसर, गोविंद येवले, विठ्ठल येवले, मनाजी बोनवटे या दिवंगत कारसेवकांच्या नातलगांचा तर राजाराम बाणखेले, बाळासाहेब शिंदे, भगवान काळे,दिनेश गवळी, ज्ञानेश्वर पडवळ,गोरक्ष राक्षे, बाळासाहेब काळे, अशोक आवटे, राजेंद्र गोडसे यांच्यासह 30 शिवसैनिकांचा सत्कार करण्यात आला.

कारसेवकांच्या वतीने शिवसेना जिल्हा संघटक राजाराम बाणखेले यांनी त्यावेळच्या आठवणी सांगत, अडवाणींच्या रथयात्रेचे मंचर येथे स्वागत, शिलापुजन व अयोध्येत कारसेवेस गेल्यावर व येताना कशाप्रकारे जीवावर उदार होऊन शिवसैनिकांनी शिवसेनाप्रमुखांचा आदेश पाळला. त्यावेळी जबाबदारी झटकून शिवसेनेवर खापर फोडणारे, न्यायालयीन आदेशाने राममंदिर ऊभे राहिले पण भाजपवाले स्वतःचीच टिमकी वाजवत राहिले. शिवसेनेचे योगदान काय, असा प्रश्न कारसेवेस नसणारे आज विचारत आहे,असे ते म्हणाले.

या कार्यक्रमासाठी डोंबिवली उपविभाग प्रमुख गोरक्ष खोकराळे, मंचर नगरपंचायत संपर्क प्रमुख अरुण बाणखेले, युवासेना तालुकाप्रमुख विवेक पिंगळे, वहातुक सेना तालुका प्रमुख संजय चिंचपुरे, विकास जाधव, महेश घोडके, संदिप निघोट, चेतन निघोट, चंद्रकांत निघोट, मा. सैनिक मारुती निघोट , विनोद घुले, अजित मोरडे, शंकर डोकडे, वैभव कराळे, विजय जाधव, भानुदास कराळे, संघटिका ऊज्वला नाईकडे, बाळासाहेब थोरात, दिलीप बाणखेले, ऊत्तम भेके उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन माहिला आघाडीच्या तालुका प्रमुख सुरेखा निघोट, अनिल निघोट, तालुका समन्वयक बाबाजी कराळे यांनी केले.