अर्थवृत्त – हुश्श!! शेअर बाजार सावरला, तीन दिवसांच्या पडझडीनंतर गुंतवणूकदारांना दिलासा

गेल्या तीन दिवसांपासून शेअर बाजार निर्देशांकात झालेल्या घसरणीनंतर शुक्रवारी बाजार सावरला आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांक आज वाढीसोबत बंद झाले. सेन्सेक्स 496.37 अंक म्हणजेच 0.70 टक्के वाढीसोबत 71,683.23 अंकांवर बंद झाले. तर निफ्टी 160.15 अंक म्हणजेच 0.75 टक्क्यांच्या वाढीसोबत 21,622.40 अंकांच्या स्तरांवर बंद झाले. मिडपॅप स्मॉलपॅप शेअर्समध्ये चांगली खरेदी दिसली. तर बँकिंग शेअर्समध्ये दबाव दिसला. पीएसई, इन्फ्रा, मेटल शेअरमध्ये खरेदी झाली. तर एनर्जी, ऑटो इंडेक्स वाढीसोबत बंद झाले. आयटी, रियल्टी, फार्मा शेअरही वाढले. ओएनजीसी, भारती एअरटेल, एनटीपीसी, टेक महिंद्रा आणि एसबीआय लाईफ इन्शुरन्स निफ्टीचे टॉप गनेर राहिले. तर इंड्सइंड बँक, एचडीएफसी बँक, कोटक महिंद्रा बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया निफ्टीची टॉप लुजर राहिले.

एमजीची नवी एस्टर लाँच

एमजी इंडियाने हिंदुस्थानात आपली एन्ट्री लेवल एसयूव्ही एस्टरला मार्पेटमध्ये लाँच केले आहे. स्प्रिंट, शाईन, सिलेक्ट, शार्प प्रो आणि सॅवी प्रो या पाच रंगात खरेदी करू शकता. मॅन्युअल ट्रान्समिशन मॉडलची एक्स शोरूम किंमत 9.98 लाख रुपये, 11.68 लाख, 12.98 लाख आणि 14.40 लाख रुपये आहे. या कारमध्ये वायरलेस चार्जर, ऑटो डिमिंग, वायरलेस कनेक्टिव्हिटीसोबत अँड्रॉईड ऑटो, अॅपल कारप्ले, पॅनारमिक सनरूफसारखे फीचर्स आहेत.

रिलायन्सला 19,641 कोटींचा नफा

रिलायन्स इंडस्ट्रीजने आर्थिक वर्ष 2023-24च्या तिसऱ्या तिमाहीतील आकडेवारी आज जारी केली. ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत रिलायन्स इंडस्ट्रीजला 11 टक्क्यांच्या वाढीसोबत 19,641 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. गेल्या वर्षी कंपनीला तिसऱ्या तिमाहीत 17,706 कोटी रुपयांचा नफा झाला होता. कंपनीचा नेट रेव्हेन्यू 3.2 टक्के वाढून 248,160 कोटी रुपये झाला आहे.

कॉम्प्लॅनच्या नव्या मोहिमेत माधुरी

कॉम्प्लॅनने मुलांच्या आरोग्यासाठी एक नवीन मोहीम सुरू केली आहे. आय एम कॉम्प्लॅन बॉय-गर्लच्या आयकॉनिक ब्रँडशी जोडल्याबद्दल मला आनंद होत आहे. कारण मी एक ‘कॉम्प्लॅन मॉम’ आहे. मी एक आई असून मुलांना त्यांच्या योग्य वाढीसाठीच्या आव्हानांना समजू शकते, असे माधुरी दीक्षित म्हणाली. या वेळी झायडस वेलनेसचे सीईओ तरुण अरोरा उपस्थित होते. कॉम्प्लॅन हा मुलांच्या आरोग्य खाद्य पेय श्रेणीतील एक प्रतिष्ठत ब्रँड आहे आणि त्यात 100% दूध प्रथिने आहेत.

अवघ्या 72 तासांत 13 लाख कोटी बुडाले

शेअर मार्केटमध्ये मंगळवार, बुधवार आणि गुरुवार अशा तीन दिवसांत गुंतवणूकदारांचे 13.2 लाख कोटी रुपये बुडाले आहेत. तीन दिवसांत सेन्सेक्स 2700 अंकांनी घसरल्याने गुंतवणूकदार अक्षरशः हवालदिल झाले होते. या तीन दिवसांत सर्वात जास्त फटका एचडीएफसी बँकेला बसला आहे.

जावाची नवी बाईक लाँच

रॉयल एन्फील्डच्या क्लासिक 350ला टक्कर देण्यासाठी जावा येज्डी मोटरसायकल्सने आपली नवीन बाईक जावा 350 बाईकला नव्या व्हेरियंटमध्ये लाँच केले आहे. ही बाईक रॉयल एनफील्ड क्लासिक 350लासुद्धा जोरदार टक्कर देईल. जावाने आपल्या या बाईकमध्ये काही खास फीचर्स दिले आहेत. शिवाय अपडेटेड चेसीस, पॉवर आणि टॉर्कला जारी केले आहे.  Maroon, Black आणि Mystique Orange या तीन नवीन कलरसोबत लाँच केले आहे.

सँडल वूड प्रीमियम प्युअर अगरबत्ती

महाराजा अगरबत्ती कंपनीने आपली सँडल वूड प्रीमियम प्युअर अगरबत्ती बाजारात आणली आहे.या अगरबत्तीच्या मनमोहक सुगंधाने देवाची प्रार्थना करताना मन अगदी प्रसन्न राहते. या अगरबत्तीला नैसर्गिक चंदनाचा सुगंध आहे. ही अगरबत्ती 50 ग्रॅम, 100 ग्रॅम आणि 250 ग्रॅमच्या पॅकिंगमध्ये उपलब्ध आहे. महाराजा कंपनीची अगरबत्ती प्रत्येक अगरबत्तीच्या दुकानात तसेच महाराजा अगरबत्ती, रघुनाथ निवास, डी.व्ही. देशपांडे मार्ग, शिवाजी पार्क, रोड क्र. 4, दादर, मुंबई-28 येथे उपलब्ध आहेत.

‘एफडी’वर 8.40 टक्के व्याजदर

फेडरल बँकेने एफडीवरील व्याज दरात बदल केले. बँकेने 500 दिवसांच्या व्याजदराला सर्वसामान्य ग्राहकांसाठी 7.75 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 8.25 टक्के व्याज दराची घोषणा केली आहे. 500 दिवसांसाठी एफडी केल्यास बँक 8.40 टक्के व्याज देत आहे. परंतु एफडीचा कालावधी पूर्ण झाल्याशिवाय पैसे काढता येणार नाहीत.

गुगलमध्ये कर्मचारी कपात सुरूच

गुगल कंपनी 2024 या वर्षात आणखी कर्मचारी कपात करणार आहे. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्या एका इंटरनल मेमोमधून माहिती समोर आली. गुगलने गेल्या वर्षी 12 हजार लोकांना कामावरून काढून टाकले. यात हार्डवेयर, अॅड सेल, सर्च शॉपिंग, मॅप्स, पॉलिसी, कोर इंजिनिअरिंग, यूटय़ूब विभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

घरांच्या किमतीत 19 टक्के वाढ

देशभरात प्रॉपर्टीच्या किमतीत मोठी वाढ होत आहे. प्रमुख शहरातील प्रॉपर्टीच्या किमतीत 19 टक्के वाढ झाली आहे. मॅजिकब्रिक्स प्रॉपइंडेक्सच्या रिपोर्टमधून ही माहिती समोर आली आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर 2023मध्ये प्रॉपर्टीच्या किमतीत वार्षिक आधारावर 18.8 टक्के तर तिमाहीतील आधारावर 3.97 टक्के वाढ झाली आहे.

टाटा स्टीलच्या 3 हजार नोकऱ्या धोक्यात

2024च्या सुरुवातीपासून अनेक कंपन्या कर्मचारी कपात करीत आहेत. यात आता टाटा स्टील कंपनीचाही समावेश झाला असून कंपनी लकवरच 3 हजार कर्मचाऱ्यांना नारळ देणार आहे. आर्थिक समस्या उद्भवल्याने कंपनीने हा निर्णय घेतल्याची माहिती आहे. टाटा स्टील कंपनीतील कर्मचारी कपात ही यूके युनिटमध्ये होणार आहे. कंपनी आपल्या पोर्ट टालबोट स्टिलवर्क्स युनिटमधील दोन ब्लास्ट फर्नेसला बंद करणार आहे.

पेप्सिकोचे नवे सीईओ

पेप्सिको इंडियाचे नवे सीईओ म्हणून जागृत कोटेचा यांची नियुक्ती करण्यात आली. ते आफ्रिका, मध्य पूर्व आणि दक्षिण आशियात पेप्सिकोचे मुख्य व्यावसायिक अधिकारी म्हणून काम करत आहेत. कोटेचा मार्चमध्ये सीईओचा पदभार स्वीकारणार आहेत.

थर्ड पार्टी क्लेम

विमा मिळवण्यासाठी चुकीची कागदपत्रे दाखल केलेल्या विमाधारकाची रिलायन्स जनरल इन्शुरन्सने फसवणुकीची पोलखोल केली. अपघातात थर्ड-पार्टी इन्जुरी क्लेममध्ये वाहनांची कागदपत्रे तपासल्यानंतर हा प्रकार उघडकीस आल्याचे रिलायन्सने म्हटले आहे.

2 नवीन स्टोर्स ओपन

जयपोर आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेलच्या आघाडीच्या कलात्मक लाइफस्टाईल ब्रँडचे ओबेरॉय मॉल आणि आर सिटी मॉल येथे दोन नवीन स्टोअर्स उघडण्यात आले आहेत. मुंबईमध्ये दोन नवीन स्टोअर्ससह जयपोरने देशभरात 26 स्टोअर्स उघडले आहेत.

बहुभाषिक उपक्रम

डिपॉझिटरी सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेडने दोन वैशिष्टय़पूर्ण बहुभाषिक उपक्रम सुरू करण्याची घोषणा सेबीच्या अध्यक्षा माधबी पुरी बुच यांनी रौप्य महोत्सवी कार्यक्रमात केली. गुंतवणूकदारांना 23 भाषांमधून ही सुविधा मिळणार आहे.