‘Chandrayaan-3’च्या यशाचा शेअर बाजारात जल्लोष, हे 10 शेअर ‘रॉकेट’च्या वेगाने धावणार

23 ऑगस्ट, 2023 चा दिवस हिंदुस्थानसाठी ऐतिहासिक ठरला. ‘इस्त्रो’चे मिशन चंद्र यशस्वी झाले आणि चांद्रयान-3चे विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या उतरले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर हे लँडर उतरले असून येथे पोहोचणारा हिंदुस्थान पहिला देश ठरला आहे. चांद्रयान-3च्या यशामुळे संपूर्ण देशात आनंदाचे वातावरण असून शेअर बाजारानेही जल्लोष केला. बाजार सुरू होताच मार्केटमध्ये चांगलीच तेजी दिसून आली.

गुरुवारी पहिल्या 15 मिनिटांमध्ये मार्केट 300 पाईंटनी वाढले. सेन्सेक्स 440 पॉईंट वाढून 65 हजार 875 वर पोहोचला. तर निफ्टी आणि बँक निफ्टीमध्येही तेजी दिसून आली. दोन्हीकडे 0.50 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली. यासह इस्त्रोच्या या मिशन चंद्रमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या काही कंपन्यांचे शेअरही तुफान धावताना दिसण्याची शक्यता आहे.

  1. टाटा स्टील (Tata Steel) –

टाटा समुहाच्या टाटा स्टील कंपनीने तयार केलेल्या क्रेनने मदतीने लॉन्चिंग वाहन एलव्हीएम3 एम4ला असेंबल करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

2. भेल (BHEL) –

हा शेअरही रॉकेटच्या वेगाने धावण्याची शक्यता आहे. चांद्रयान यशस्वी झाल्याने याचा फायदा या शेअरला होऊ शकतो. गेल्या 5 दिवसात या शेअरने गुंतवणूकदारांना 10 टक्के परतावा दिला आहे. या कंपनीने मिशन चंद्रसाठी बॅटरी पुरवल्या होत्या.

3. ए एंड टी (Larsen and Toubro) –

लार्सन एँड टुब्रोने चांद्रयान-3 साठी अनेक पार्टस तयार केले. एलव्हीएम3 एम4 बनवण्यात या कंपनीने मोठे योगदान दिले.

4. गोदरेज इंडस्ट्रीज (Godrej Industries) –

इस्त्रोच्या मिशन चंद्रसाठी या कंपनीने वाहन विकास इंजिन, CE20 आणि सॅटेलाइट थ्रस्टर्स पुरवले होते. या शेअरवरही गुंतवणूकदारांची नजर असणार आहे.

5. सेंटम इलेक्ट्रॉनिक्स (Centum Electronics) –

बुधवारीच या शेअरने तब्बल 14.51 टक्के वाढ नोंदवली होती. चांद्रयान मोहिमेसाठी या कंपनीने इलेक्ट्रीकल सिस्टिम आणि क्रिटिकल कंपोनें बनवणाऱ्या या कंपनीचा शेअर आजही चांगला वाढू शकतो.

6. मिश्र धातू निगम (Mishra Dhatu Nigam) –

चांद्रयानासाठी आवश्यक माल मिश्र धातू निगमने पुरवला होता. कोबाल्ट बेस मिश्र धातू, निकेल बेस मिश्र धातू, टायटॅनियम मिश्र धातू आणि विशेष स्टील्स याचा समावेश होता. हा शेअरही चांगला परतावा मिळवून देऊ शकतो.

7. एमटीएआर टेक्नॉलॉजी (MTAR Technologies) –

इस्त्रोच्या महत्त्वाकांक्षी मोहिमेसाठी या कंपनीने इंजिन आणि बुस्टर पंपसह अनेक गोष्टी पुरवल्या होत्या. हा शेअरही रॉकेटच्या वेगाने पळू शकतो.

Aditya L1 mission – ‘इस्त्रो’चं पुढील लक्ष्य सूर्य, लवकरच लॉन्च करणार ‘आदित्य एल-1’ अंतराळयान

8. हिंदुस्थान एरोनॉटिक्स ली. (Hindustan Aeronautics Ltd) –

मिशन चंद्रसाठी हिंदुस्थान एरोनॉटिक्स ली. कंपनीनेही हातभार लावला होता. हा शेअरही आज चांगलाच वाढू शकतो.

9. पारस डिफेन्स एंड स्पेस टेक्नॉलॉजी (Paras Defence & Space Technologies) –

खासगी क्षेत्रातील या कंपनीनेही चांद्रयान मोहिमेत सिंहाचा वाटा उचलला. ही कंपनी प्रमुख पुरवठादार असून बुधवारीच हा शेअर 5 टक्क्यांहून अधिक वाढला होता.

10. वालचंदनगर इंडस्ट्रीज (Walchandnagar Industries) –

चांद्रयान-3च्या यशामध्ये या कंपनीनेही खारीचा वाटा उचलला. त्यामुळे हा शेअरही आगामी काळात धमाल उडवू शकतो.

‘चांद्रयानासोबत गेलेल्या सर्व प्रवाशांना सलाम’, राजस्थानच्या क्रीडामंत्र्यांचं अज्ञान; नेटकऱ्यांनी टोचले कान

(टीप – आम्ही कोणताही शेअर घेण्याचा सल्ला देत नाही. फक्त मार्केटमधील स्थितीबाबत माहिती देत आहोत. कोणताही शेअर खरेदी करण्यापूर्वी तज्ञाचा सल्ला नक्की घ्या)