‘मी तुझी सर्वात मौल्यवान…’, 11 वर्षीय मुलाचा खून करून प्रेयसीचा प्रियकराला फोन, दिल्ली हादरली

राजधानी नवी दिल्लीमध्ये 11 वर्षीय मुलाचा निर्घृणपणे खून केल्याचे उघडकीस आले आहे. दिव्यांश उर्फ बिट्टू असे मृत मुलाचे नाव असून याप्रकरणी पोलिसांनी पूजा नावाच्या तरुणीला अटक केली आहे. दिव्यांशचे वडील जितेंद्र हे तिचे प्रियकर होते. मात्र दोघांमध्ये काही कारणाने वाद झाल्याने पूजाने प्रियकराच्या मुलाला संपवले. धक्कादायक म्हणजे दिव्यांशची हत्या केल्यानंतर पूजाने आपल्या प्रियकराला फोन करून मी तुझी सर्वात मौल्यवान गोष्ट तुझ्यापासून हिरावून घेतल्याचे म्हटले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पूजा आणि मृत दिव्यांशचे वडील जितेंद्र हे 2019 पासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये रहात होते. जितेंद्रने आपल्या पत्नीला घटस्फोट देऊन पूजाला तिच्यासोबत लग्न करण्याचे वचन दिले होते. 17 ऑक्टोबर 2019 ला दोघांनी आर्य समाजाच्या एका मंदिरात लग्नही केले होते. मात्र कोर्ट मॅरेज शक्य नव्हते. कारण तोपर्यंत जितेंद्रने आपल्या पत्नीला घटस्फोट दिला नव्हता.

पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेऊन आपण कोर्ट मॅरेज करू असे आश्वासन जितेंद्रने पूजाला दिले होते. त्यानंतर दोघेही एकाच घरात राहू लागले. घटस्फोटाच्या मुद्द्यावरून दोघांमध्ये भांडणही होत होते. मात्र 2022मध्ये पूजाला सोडून जितेंद्र पुन्हा आपली पत्नी आणि मुलाकडे परतला. दिव्यांशमुळेच प्रियकर पहिल्या पत्नीकडे परतला असा संशय पूजाला होता. त्यामुळे तिने त्याचाच काटा काढण्याचा कट रचला. प्रियकराला धडा शिकवण्यासाठी पूजाने दिव्यांशचा खून केला.

पूजाने 10 ऑगस्ट रोजी दोघांच्या एका कॉमन मित्राला जितेंद्रच्या घराचा पत्ता विचारला. ती जितेंद्रच्या घरी पोहोचली तेव्हा दरवाजा उघडाच होता आणि दिव्यांश बेडवर झोपलेला होता. घरात अन्य कोणीही नसल्याचा फायदा घेत पूजाने दिव्यांशचा गळा दाबला आणि खून करून त्याचा मृतदेह बेडमध्ये लपवून फरार झाली.

Rajkot – पैसे कमावण्यासाठी नीचपणाची हद्द, सासऱ्याने सुनेचे व्हिडीओ पॉर्नसाईटला विकले

पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने पूजाला ओळखले. त्यानंतर तिला पकडण्यासाठी नजफगड-नागलोई रोडवरील रणहौला, निहाल विहार आणि रिशल गार्डन भागातील जवळपास 300 सीसीटीव्ही तपासले. अखेर हत्येच्या तीन दिवसांनतर पूजाला बक्करवाला भागातून अटक करण्यात आले. अटकेनंतर पूजाने आपला गुन्हाही कबूल केला.

भाजी चांगली झाली नाही म्हणून बायकोला जिवंत जाळलं