यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड, पुसद भागात भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिक भयभीत

>> प्रसाद नायगावकर

यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड, पुसद भागात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. यामुळे नागरिकात भीतीचे वातावरण आहे. सकाळी 6 वाजून ८ मिनिटांनी भूगर्भातून आवाज येऊ लागला आणि जमीन हादरली. ज्यांची घरे टिनाची आहेत त्यांना हे धक्के जास्त जाणवले. प्राथमिक माहितीनुसार या धक्क्यामुळे कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झालेली नाही. मात्र सकाळच्या सुमारास अचानक भूकंपाच्या धक्का जाणवल्याने नागरिक भयभीत झाले होते.

यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड, पुसद हा भाग मराठवाड्याच्या सीमेलगतचा भाग आहे. मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्याला सकाळी 4.5 आणि 3.6 रिश्टल स्केलचे भूकंपाचे हादरे बसले. हिंगोलीतील रामेश्वर तांडा हे भूकंपाचे केंद्र आहे. 1993 नंतर मराठवाड्याला बसलेला हा सर्वात मोठा भूकंप आहे.

Marathwada Earthquake – हिंगोलीतील रामेश्वर तांडा भूकंपाचे केंद्र, 1993 नंतरचा सर्वात मोठा भूकंप

दरम्यान, या भूकंपानंतर नागरिकांना किल्लारी येथे झालेल्या भूकंपांची आठवण झाली. भूकंपानंतर यामातमाळ प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. अद्याप प्रशासनने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. यवतमाळ जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश राऊत यांनी याबाबत सविस्तर माहिती घेत असल्याचे सांगितले.