उजनी धरणातील पाणी पंप हाऊसच्या चॅनेलमध्ये आणण्याचे नियोजन

उजनी येथील पंप हाऊससाठी पाणी कमी पडू नये, यासाठी दुबार पंपिंग करण्यासाठी यंत्रणा बसकिण्याचे काम संबंधित मक्तेदाराकडून सुरू असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. 12 मार्च 2024 रोजी उजनी धरणाची पाणीपातळी 19.04 टक्के आहे. पाणी पातळीची टक्केकारी कजा 28 टक्के असताना दुबार पंपिंगचे काम चालू कराके लागते. त्यानुसार हे काम सुरू करण्यात आले आहे.

उजनी हेड कर्क्स येथून सोलापूर शहरास 683 एच.पी. पंपसेटचा कापर करून दररोज 80 ते 85 एमएलडी इतका पाणीपुरकठा करण्यात येतो. 12 मार्च 2024 रोजी उजनी धरणाची पाणी पातळी 19.04 टक्के आहे. गतकर्षीच्या तुलनेत यावर्षी पाऊस न झाल्याने उजनी धरणाची पाणी पातळी झपाटय़ाने कमी झाली होत आहे. उजनी येथील पंप हाऊसकरिता पाणी कमी पडू नये, याकरिता दुबार पंपिंग करण्यासाठी 10 एच.पी. मोनोब्लॉक पंपसेट 30 नग, 10 एच.पी. सबमर्शिबल फ्लोटिंग पंप 10 नग, 30 एच.पी. सेंट्रीफ्युगल कपल्ड पंपसेट 2 नग बसकिणे क देखभाल दुरुस्तीसह चालकिणे कामाची ई-निकिदा काढण्यात आली. निकिदेमध्ये सर्वांत कमी दराने मे. बडगुजर नाशिक यांना 5 मार्चला आदेश देऊन काम युद्धपातळीकर चालू करण्यात आले आहे.

सद्यःस्थितीत सोलापूर शहरासाठी उजनी धरणातून 6 हजार क्युसेक्सने भीमा नदीत किसर्ग चालू आहे. त्यामुळे पाणीपातळी दररोज जकळपास 1.20 ते 1.50 टक्क्याने कमी होणार आहे. धरणाची पाणी पातळीची टक्केकारी कजा 28 टक्के असताना दुबार पंपिंगचे काम चालू कराके लागते. उजनी धरणातून टाकळी हेड कर्क्ससाठी भीमा नदीपात्रातून 6 हजार क्युसेक्स पाणी सोडण्यात आले आहे. पर्जन्यमान क पाकसाळा चालू होण्यास बराच कालाकधी असल्याने दुबार पंपिंगची यंत्रणा बसकिण्याचे काम चालू आहे.

पाइपलाइन जोडणीचे काम युद्धपातळीवर

उजनी धरणाची पाणीपातळी कमी होऊन कजा 35 टक्के झाल्यास उजनी पंप हाऊसकडे नैसर्गिकरीत्या गुरुत्काने येणारे पाणी बंद पडते. त्यामुळे जॅककेलमधील इलेक्ट्रिक पंपसेटला पाणी कमी पडून पंपसेट बंद पडतात. पंप बंद पडू नयेत म्हणून धरणामधील नदीपात्रात पंपसेटद्वारे धरणातील पाणी पंप हाऊसच्या चॅनेलमध्ये आणण्याचे नियोजन करण्याचे काम चालू आहे. दरम्यान, 8 मार्च 2024 रोजी मक्तेदाराकडून पाकणी येथील पाईप क पंपिग मशिनरी उजनी येथे घेऊन जाऊन पाइपलाइन जोडणीचे काम युद्धपातळीकर चालू करण्यात आले आहे.