चांद्रयान-3 : डीबूस्टिंग प्रक्रिया, विक्रम लँडर लँडिंगपासून एक पाऊल दूर

हिंदुस्थानचा अंतराळ संशोधन संस्थेनं (इस्रो) चंद्रयान-3 च्या विक्रम लँडरसह 4 वाजता यशस्वीरित्या डीबूस्टिंग प्रक्रिया केली आणि चंद्राच्या जवळच्या कक्षेत आणलं. विक्रम लँडर सुस्थितीत असल्याचं इस्रोनं म्हटलं आहे.

हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे, कारण 23 ऑगस्ट रोजी नियोजित चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशावर नियोजित सॉफ्ट लँडिंग यामुळे होणार आहे. हिंदुस्थान अंतराळ कार्यक्रमाचे जनक डॉ. विक्रम साराभाई यांचे नाव असलेले विक्रम लँडर 14 जुलै रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून LVM3 रॉकेटद्वारे अवकाशात सोडण्यात आले. ते 5 ऑगस्ट रोजी चंद्राच्या कक्षेत दाखल झाले आणि यशस्वीरित्या वेगळे झाले.

डीबूस्टिंग प्रक्रिया ही एक महत्त्वाची प्रक्रिया होती ज्यामध्ये अंतराळयानाचा वेग कमी करून स्वतःला एका कक्षेत ठेवण्यासाठी काम करेल. इस्रो रविवारी रात्री 8:00 वाजता पुन्हा एक डीबूस्टिंग प्रक्रिया चालवेल.